CURRENT-NEWS

Today News

त्रैमासिक विवरणपत्र पाठविण्याचे आवाहन

Written By tuljapurlive.com on Thursday, 24 April 2014 | Thursday, April 24, 2014

उस्मानाबाद :- जिल्ह्यातील सर्व केंद्र -राज्य शासनाची कार्यालये,निमशासकीय कार्यालये,शासकीय अंगीकृत उपक्रम,महामंडळे,स्थानिक स्वराज्य संस्था आणि ज्या खाजगी आस्थपनेत 10 किंवा अधिक मनुष्यबळ आहे अशा आस्थापनांनी 31 मार्चअखेरचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) 30 एप्रिलपर्यंत सादर करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक यांनी कळविले आहे.
    सेवा योजन कार्यालये(रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे) अधिनियम 1959 कलम 5 (1) (2) आणि नियमावली 1960 नियम क्रमांक 6 अन्वये अशी माहिती सादर करणे बंधनकारक आहे. रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या http://maharojgar.gov.in या संकेतस्थळावरही विवरणपत्र ऑनलाईन पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. विवरणपत्र न पाठविणा-या आस्थापनाविरुध्द दंडात्मक कार्यवाहीची तरतूद असून अशा आस्थापनाची नावे विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याचे सहायक संचालक यांनी कळविले आहे.               

उस्मानाबाद शहरातही घुमला स्वच्छतेचा जागर

उस्मानाबाद :- नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटावे आणि त्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन उस्मानाबाद शहरात स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छतेचा हा जागर संपूर्ण जिल्ह्यात केला जाणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी सांगितले.
      काही दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी नगरपालिका क्षेत्रात भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळीच त्यांनी नगरपालिकेच्या अधिका-यांना शहरातील स्वच्छतेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. तुळजापूर येथून डॉ. नारनवरे  यांनी या स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली. विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी आणि विविध शाळा-महाविद्यालये यांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या सहकार्याने ही मोहिम राबविली.
     जिल्हा परिषद यंत्रणेने आज निर्मल भारत अभियानांतर्गत या मोहिमेचा जोरदार जागर केला. सकाळी 8 वाजताच शिक्षण, आरोग्य यासंह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी जिल्हा परिषदेच्य़ा कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दाखल झाले. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रावत यांनी हातात झाडू घेतला आणि सर्व सहकाऱ्यासह परिसर स्वच्छतेला सुरुवात झाली. पदाचा कोणताही अभिनिवेश न बाळगता शहर स्वच्छतेच्या ध्यासाने ही मोहिम राबविली गेली. सुरुवातीला शहर बसस्थानकात साफसफाई करण्यात आली. उपस्थित नागरिकांनाही आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
      तेथून परिसराची स्वच्छता करीत आणि त्या-त्या परिसरातील नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करीत अधिकारी-कर्मचारी-विद्यार्थी-शिक्षक हे छत्रपती शिवाजी महाराज चौक, ताजमहल टॉकीज, नगरवाचनालय, माऊली चौक, नेहरु चौक, देशपांडे स्टॅन्ड या भागातील परिसर स्वच्छता करण्यात आली. प्रत्येक नागरिकाने कचरा हा कचरापेटीतच टाकावा, आसपासच्या परिसरात उघड्यावर कचरा फेकू नये. त्यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन डॉ. नारनवरे आणि रावत यांनी केले.
यावेळी डॉ. नारनवरे यांनी विविध दुकानदारांशीही संवाद साधला. दुकानाजवळ कचरापेटी ठेवा. तेथे येणाऱ्या नागरिकांनाही कचरा तेथेच टाकण्यास सांगा, कोणत्याही परिस्थितीत कचरा इतरत्र पडता कामा नये, असे डॉ. नारनवरे यांनी बजावले. तसे झाल्यास दंड करावा लागेल. त्यामुळे काळजी घ्या, असा सल्ला देण्यासही ते विसरले नाहीत.
श्रीमती रावत यांनीही या मार्गावरील रहिवाशांशी संवाद साधला. घरातील कचरा बाहेर कुठेही टाकू नका, असे आवाहन त्यांनी केले. परिसर स्वच्छतेची सुरुवात स्वताच्या घरापासून करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुमारे दोन तासांहून अधिक काळ शहराच्या विविध भागात या मोहिमेच्या माध्यमातून परिसर स्वच्छता करण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, निर्मल भारत अभियानाचे समन्वयक डॉ. शीतलकुमार मुकणे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. हाश्मी, तहसीलदार सुभाष काकडे, नगरपरिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह विविध यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.   ***

दारुच्‍या नशेत इसमाची आत्‍महत्‍या

पांगरी (गणेश गोडसे) :- दारूच्या नशेत एकाने स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावुन घेऊन आत्महत्या केल्याची घटना धस पिंपळगांव (ता.बार्शी) येथील शिवारात घडली.
    दादा राजाराम चोरमले (वय 35, रा. धस पिंपपळगांव) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याचे नांव आहे. नवनाथ दशरथ चोरमले (वय 50, रा.घाटकोपर मुंबई) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, दादा चोरमले यांनी दारूच्या नशेत पिंपळगांव-खडकलगांव रोडवरील त्यांच्या मालकीच्या शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणुन गुन्हा दाखल करण्‍यात आला असून अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.

टेम्‍पोची बसला जोराची धडक; जीवितहानी टळली

पांगरी (गणेश गोडसे) :- भरधाव वेगात निघालेल्या टेम्पोने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला जोरदार कट मारल्यामुळे झालेल्या अपघातात एस.टी.बसचे पंधरा हजार रूपयांचे नुकसान झाल्याची घटना दि. 23 एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्‍याच्या सुमारास बार्शी-तुळजापुर मार्गावर शेलगांव मा. हदीत घडली. एस.टी.बसला कट मारून नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात टेम्पोचालकाविरूदध गुन्हा दाखल करन्यात आला आहे. सुदैवाने बसला कट पाठीमागील बाजुला बसल्यामुळे जिवीतहानी टळली.
    स.टी.बसचे चालक अंकुश गणपती रोकडे (रा.कुंभारी, ता.तुळजापुर, जि.उस्मानाबाद) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ते त्यांच्या ताब्यातील एम.एच.20 बि.एल.2101 ही बस बार्शीहुन प्रवाशी घेऊन तुळजापुरकडे घेऊन जात असताना समोरून बार्शीकडे भरधाव वेगात निघालेल्या एम.एच.12 क्यु.5990 हया टेम्पोच्या अज्ञात चालकाने त्यांच्या बसला जोरदार कट मारला. बसच्या पाठिमागील बाजुच्या काचा व पत्रा फाटला असुन नुकसान झाले आहे. चालक रोकडे यांच्या फिर्यादिवरून अज्ञात टेम्पोचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.

इंटरनेटच्‍या जमान्‍यात मामाचा गाव हरवला...!

      'झुक झुक आगीन गाडी, पळती गाडी पाहू या, मामाच्‍या गावाला जाऊ या!' या बालगीताचा विसर आता पडला असून काळाच्‍या ओघात अन् इंटरनेटच्‍या जमान्‍यात मामाचा गाव हरवला आहे. पूर्वी उन्‍हाळी सुट्टी शाळेला होण्‍यापूर्वी बच्‍चे कंपनी मनात बते रचायची, ते मामाच्‍या गावाला जाऊन धम्‍माल करण्‍याचा... पण सध्‍याच्‍या इंटरनेटच्‍या युगात मामाचा गाव परका झाला आहे. त्‍याची जागा आता फेसबुक, व्‍हॅटसअॅप आणि व्‍हीडीओ थ्रीडी गेमने घेतली आहे. वयाच्‍या खोट्या माहितीच्‍या आधारे लहान लहान शाळकरी मुले-मुली फेसबुकवर बनावट खाते उघडून गप्‍पामध्‍ये रमत आहेत. त्‍यामुळे पालकांनी वेळीच सावध होऊन यांना रोखायला हवे...
    पूर्वी मामाच्‍या गावी मोठी धम्‍माल व्‍हायची. सुरपारंबा, ईट्टी-दांडू, लंगडी, चिंचोके, गजगे, कोया, गोट्या, काचकोरे, चिंपा, लिगोर, लपाछपी, चोर-पोलीस हे खेळ मोठ्या गंमतीने खेळले जायचे. त्‍यातून आनंदही मिळायचा. 'आपडी तुपडी तेलंगी धार, धर गं बेबी हीच कान' म्‍हणत एकमेकांचे कान पकडायचे आणि 'चाऊ, माऊ, चाऊ गाऊ... पकालीचे पाणी गुटु गुटू पीऊ' असे म्‍हणून आंनद लुटला जायचा. शेतातील आंबे, टरबूज, कलिंगड यावर ताव मारायचा.. पण निसर्गाच्‍या लहरीपणामुळे आंबेही आता क्‍वचितच दिसत आहेत. ईट्टी-दांडू खेळत खेळत जनावरे दूर गेली की, नंबरप्रमाणे जनावरे हाकत आणायचे. पूर्वीसारखे आता काही राहिले नसल्‍याचे अनेकजण बोलतात. आता प्रत्‍यक्ष गाठीभेटी घेण्‍यास कुणालाही वेळ नाही. फक्‍त मोबाईल वरुन विचारपूस करायची कसे काय चाललयं? बरं हाय नव्‍हं..? पूर्वी लग्‍नपत्रिका घरपोच केल्‍या जायच्‍या... भाकरी बांधून न्‍यायच्‍या आणि पाहुण्‍यांना लग्‍नाला यायला सांगायचे. पण आता या लग्‍नपत्रिकांची जागा एसएमएस ने घेतली असून चक्‍क मोबाईलवरच लग्‍नपत्रिका पाठवली जात आहे. याला काय म्‍हणायचे, काळ बदलला म्‍हणायचे की माणसं बदलली म्‍हणायचं...!
- भिकाजी जाधव
कळंब

बार्शी आगारातील आंदोलनातील बडतर्फ कर्मचार्‍यांचा आत्मदहनाचा इशारा

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- बार्शी आगारातील आगार बारा बडतर्फ कर्मचार्‍यांनी, चुकीच्या पध्दतीने कारवाई केल्याचे सांगत दि.१ मे महाराष्ट्र दिनादिवशी विभाग नियंत्रक सोलापूर यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
         याबात अधिक माहिती अशी, बार्शी आगारात २ सप्टेंबर २०१२ रोजी म.न.से. प्रणित युनियनने बंद पुकारला होता. यावेळी म.न.से.पदाधिकार्‍यांनी व्यवस्थापकाच्या तोंडावर काळी शाई फेकून झालेल्या झटापटीत साहित्याची किरकोळ तोडफोड झाली. सदरच्या घटनेला दोषी ठरवून बारा कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले. यामध्ये चालक, वाहक संतोष पंढरे, विश्वनाथ उकरंडे, शहजादा सय्यद, रामराजे भोसले, भैरवनाथ अंकुरे, इब्नेखालीन पठाण, पांडूरंग कुंभार, इंद्रसेन भड, अनिल बुलबुले, सलिममियॉं बागवान, प्रविण कदम, उत्रेश्वर यादव असे बारा कर्मचारी सेवेतून कमी करण्यात आले. याबाबत कर्मचार्‍यांशी बोलतांना, म.न.से. पदाधिकार्‍यांनी केलेल्या गैरप्रकारास कर्मचारी जबाबदार नसतांना त्यांना दोषी धरण्यात आले, विरुद्ध संघटनेतील कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येणार्‍या चुकीच्या गोष्टीमुळे अधिकार्‍यांनीही चुकीचा मार्ग अवलंबला आहे. प्रशासनाकडे वारंवार अपिल करुनही निर्णय झाला नाही. सुधारित शिस्त व अपिल कार्यपध्दती २००५ नुसार प्रथम अपिलानंतर तीन महिन्यांत तक्रारीचा निपटारा करण्याचा नियम असतांना मागील आठ महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. बडतर्फ कर्मचार्‍यांना नोकरी नसल्याने कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेवटचा पर्याय म्हणून आत्मदहन करणार असल्याचे बडतर्फ कर्मचार्‍यांनी सांगीतले.

बार्शी न.पा.शाळेचे भाडे थकल्याने जागामालकाने ठोकले कुलूप

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शहरातील नगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने चालविण्यात येणार्‍या प्राथमिक शाळांपैकी स्वामी विवेकानंद शाळा क्र.२० या शाळेचे जागा भाडे दिले नसल्याने जागा मालकाने कुलूप ठोकल्याने, शाळेचे कामकाज शाळेबाहेरील व्हरांड्यात सुरु आहे. नगरपालिका प्रशासन मंडळाला शाळेच्या मान्यतेनुसार शैलेश गावसाने, सोमनाथ गावसाने यांनी ३ वर्ग खोल्या, शौचालय आदी सुविधांसह जागा २०१० साली दरमहा २५४० या जागाभाड्यांच्या करारानुसार उपलब्ध करुन दिली. याबाबत जागा भाडे मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करुनही अद्यापपर्यंत भाडे देण्यात आले नाही. जागा मालकाने जागा भाडे मिळत नसल्याने दि.११ एप्रिलपासून कुलूप लावले असल्याने वर्ग शिक्षक व विषय शिक्षक हे बाहेरील मोकळ्या जागेत बसून कामकाज करीत आहेत. जून २०१० मध्ये डॉ.राधाकृष्ण न.पा. शाळा क्र.१८ च्या भागशाळेला जून २०११ मध्ये स्वतंत्र स्वामी विवेकानंद न.पा.शाळा क्र.२० ला मान्यता देण्यात आली. सदरच्या शाळेमध्ये बालवाडीसह इ.१ ली ते ४ थी पर्यंतचे वर्ग असून सुमारे ७३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २ शिक्षक व १ सेविका येथे कार्यरत असून यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या घटनेबाबत शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी चिलवंत यांच्याशी संपर्क साधला असता डेप्युटी डायरेक्टरकडे प्रस्ताव पाठविले आहेत, त्यांच्याकडून तांत्रीक चुका दुरुस्ती सुचविल्या त्यानुसार दुरुस्त्या करुन प्रस्ताव पाठविले आहेत परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही.

बार्शीत एकाच रात्री चार घरफोड्या, लाखाला गंडा

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : कॅन्सर हॉस्पिटल कर्मचारी वसाहतीमधील रहिवाशी गावाकडे यात्रेसाठी रामभरोसे गेल्यानंतर एकाच रात्री चार जणांची घरे फोडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागीने आदी सुमारे लाख रुपयांचा ऐवज लंपास करुन चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना बार्शीत घडली आहेत.
    निलकंठ उंबरदंड, अभिलाषा देशमुख, सिध्देश्वर शेंडे, नितीन कुलकर्णी असे यातील घरमालकांची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी सातच्या नंतर व गुरुवारी पहाटेपर्यंत सदरची घटना घडली. शेजारी राहत असलेल्या रामचंद्र माळी यांना शेजारील घराचे कुलूप तोडून कोणीतरी चोरी केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी फोनवरुन माहिती सांगीतली. सदरच्या प्रकारानंतर घरमालकांनी प्रत्यक्ष येऊन पोलिसांना हकिकत सांगीतली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सहा.पो.निरीक्षक अतुल भोस हे करीत आहेत.

राज्य संघटेनस मान्यता देण्यासाठी कार्यपध्दती निश्चित

उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्यामध्ये एकविध खेळांची अधिकृत राज्य संघटना ठरविण्याबाबत केंद्र शासनाच्या नियमावलीचा आधार घेऊन, एकविध खेळांची अधिकृत राज्य संघटना निश्चित करण्यासाठी व त्यांना महाराष्ट्र शासनाची मान्यता देण्यासाठी प्रस्तावित कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे. सदरील नियमावली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत निरीक्षणकरीता उपलब्ध आहे. या नियमातील अटी व शर्ती बाबत एकविध खेळाच्या राज्य संघटनांनी आपले अभिप्राय व आक्षेप             दि.7 मे,2014 पर्यंत संचालनालयाच्या dsys_pune@yahoo.co.in या ई-मेलवर पाठविण्यात यावेत, असे आवाहन उस्मानाबादचे जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी यांनी केले आहे

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

उस्मानाबाद -: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांचे अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने मैदानी, खो-खो, व कुस्ती खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर दि.25 एप्रिल ते 4 मे,2014 या कालावधीत सकाळी 6-30 ते 8-30 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे आयोजन करण्यात आले आहे.
     विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता दरवर्षी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षण शिबीराकरिता तज्ञ व अनुभवी शासकीय राज्य क्रीडा मार्गदर्शक सत्यन जाधव-खो-खो, श्री.गणेश पवार-मैदानी, संदीप वांजळे- कुस्ती यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच सुर्यनमस्कार, सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार, योगासने, प्राणायम, अॅरोबीक्स, मनोरंजनात्मक खेळ व व्यक्तीमत्व विकास या बाबीवर विशेष भर दिला जाणार आहे. 
       या शिबीरात सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना विनामुल्य प्रवेश दिला जाणार आहे. तरी उस्मानाबाद शहर व जिल्ह्यातील सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे नोंदवावी. संपर्कासाठी  भ्रमणध्वनी क्रमांक- मुख्य क्रीडा मार्गदर्शक श्री. सत्येन जाधव- 9028095500, श्री. पवार गणेश-9970095315 आणि संदीप वांजळे- 9850954237  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये केले आहे.

फोटो गॅलरी

जुनी लेखमाला

वाचक क्रमांक

नर—मादी धबधबा

तुळजापुरचे आजचे तापमान

जाहिरात


श्री क्षेत्र गाणगापूर, भक्‍त निवास

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील स्‍मृती मंडळ

श्री दत्‍तात्रय कृपा भक्‍त निवास, संगम रोड, श्री क्षेत्र गाणगापूर, जि. गुलबर्गा

फोन - (08470) 274449

Shri Guru Datta Family Restaurant

Temple Ghangapur, tq - Afzalpur, Dist - Gulbarga

prop : M.N. Tonashal

Cell : 9449527500, 8722199972, 7411988898

अभय डिजीटल अँन्ड बुक डेपो

मेन रोड पांगरी, ता. बार्शी

प्रो.प्रा. वासकर बंधु

मो. 9421027633, 9604471107.

गुरूदत्त सिमेंट अँन्ड इलेक्ट्रिकल्स

पांगरी, ता. बार्शी

आमच्याकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकचे साहित्य व सिमेंट योग्य दरात मिळेल.

प्रो.प्रा. विक्रांत गरड

मो. 9423989888, 9763550450

जीप व कार भाड्याने मिळेल

आमच्‍याकडे टाटा स्‍पोसिओ गोल्‍ड जीप, इंडिका, क्रुझर योग्‍य दरात भाडयाने मिळेल

संपर्क - अफझल हॉटेल

व्‍यासनगर, नळदुर्ग, ता.तुळजापूर

मो. 9096719058, 9881785863

टाटा सुमो भाडयाने मिळेल

बालाघाट झेरॉक्‍स व जनरल स्‍टोअर्स

उस्‍मानाबाद जनता बँकेच्‍या खाली, नळदुर्ग, ता.तुळजापूर

संपर्क - विक्रम मगतराव

मो. 7588937491

चालक - विनायक वाघमोडे, मो. 8007205676

सायबर कॉम्पुटर्स

भवानी चौक पांगरी, ता. बार्शी

प्रो.प्रा. निलकंठ कदम

मो. 8275303079, 9096271219

सक्सेस कॉम्पुटर इन्स्टयुट पांगरी, ता. बार्शी प्रो.प्रा. वाहिद शेख मो. 8275457858, 9767777879. सादिक रेडीएटर्स सेल्स अँन्ड सर्व्हिस

हॉटेल शालीमार समोर, बार्शी

प्रो.प्रा. सादिक काझी

मो. 9822669832, 9158499000

ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस

शिवरामनगर, पांगरी, ता. बार्शी

1 ली ते 12 वी पर्यंत गणित, इंग्रजी, विज्ञान, मराठी व इंग्रजी माध्यम.

प्रो.प्रा. दादासाहेब बचुटे

मो. 9561786109, 9404054796

जी.बी.घावटे

विमा व जनरल इंश्युरन्स प्रतिनिधी

मु.पो. पांगरी ता. बार्शी.

मो. 9922974675, 9405678213

बचुटे ट्रॅव्हल्‍स पांगरी

आमच्याकडे सर्व प्रकारच्या चारचाकी गाडया भाडयाने मिळतील

संपर्क - धनंजय बचुटे पांगरी ता.बार्शी़

मो. 8275266633, 9763637614.

कार विकणे आहे

महिंद्रा लोगन कंपनी 2007 चा मॉडेल,

ब्‍लॅक कलर, गुड कंडिशन मध्‍ये असलेली

कार योग्‍य किंमतीस विकणे आहे.

संपर्क - मनीषसिंह हजारे, नळदुर्ग (जि. उस्‍मानाबाद)

मो. 9975384400

समर्थ कॉम्‍प्‍युटर सेंटर

मेन रोड नळदुर्ग, माऊली नगर नळदुर्ग

आमच्‍याकडे नवीन संगणक विक्री, दुरुस्‍ती, नौकरीविषयक फॉर्म विक्री,

ऑनलाईन फॉर्म भरणे, जॉबवर्क यासह कलर झेरॉक्‍स

संपर्क - संजय हजारे

मो. 9860888020, 8275516356

फोन. 02471 - 246158

श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी

श्री. रमेश रामचंद्र कदम

मंगळवार पेठ, खंडोबा मंदिरासमोर श्री क्षेत्र तुळजापूर

फोन नं. 02471-243184

मो.नं. 9850280838, 9028840845

श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी

क्षेत्र तुळजापूर - पुजारी व सेवदारी, देवीच्‍या पुजेची व जेवणाची,

राहण्‍याची उत्‍तम सोय,

शिवपार्वती निवास, घाटशिळ रोड, कार पार्किंग समोर

श्री क्षेत्र तुळजापूर,

संपर्क : संभाजी शिवाजीराव चोपदार,

मो. 9850442574, 9850426337, 9922181829