उस्मानाबाद : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये सुधारणा करण्यासंबंधीचा अध्यादेश दि.14 फेब्रुवारी 2013 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. कायद्यातील सुधारणांच्या अनुषंगाने  सुसंगत पोटनियम (आदर्श उपविधी) तसेच लेखापरीक्षकांच्या नामतलिकेबाबतची जाहिरात सहकार आयुक्तांच्या वेबसाईटवर (www. sahakarayukta.maharashtra.gov.in) प्रसिध्द करण्यात आली आहे.
      आदर्श उपविधी स्विकारणेसाठी दि.15एप्रिल,2013 पर्यंत सहकारी संस्थांना विशेष सर्वसाधारण सभा बोलविणेकरीता सुचित करण्यात आले होते. या विशेष सर्वसाधारण सभेत सुधारीत कायद्यातील तरतुदींशी सुसंगत तसेच आदर्श उपविधी अनुसार सहकारी संस्थानी त्यांचे सुधारीत पोटनियम स्विकारणेआणि चालू आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण करणेकरीता कलम 75 अन्वये शासनाने मान्य केलेल्या लेखापरिक्षण पॅनेलवरील लेखापरिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. सर्वसाधारण सभेत नेमणूक करावयाचे लेखापरिक्षकांच्या पॅनेलचे कामकाज दि.31 मार्च, 2013 पर्यंत पुर्ण होणार असल्यामुळे सहकारी संस्थानी त्यांचे विशेष सर्वसाधारण सभा दि. 1एप्रिल ते 15 एप्रिल,2013  दरम्यान बोलवावी अशा सूचना सहकार आयुक्तालयामार्फत देण्यात येत आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
 
Top