मुंबई -: महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता (दुष्काळ) निधीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे 1 कोटी 15 लाख रुपयांचा धनादेश आज विधानभवन येथे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विश्वास भोसले तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे  दुष्काळ निधीसाठी 1 कोटी
मुंबई -: महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) साठी 1 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे महामंडळाचे अध्यक्ष व कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानभवन येथे सुपूर्द केला. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, पदाधिकारी कांबळे, शिंदे,  मुंदडा,  सूर्यगण,  दबके आदी मान्यवर उपस्थित होते.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे दुष्काळग्रस्तांसाठी 25 लाखाची मदतमुंबई -: दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आपली सामाजिक बांधिलकी समजून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने 25 लाख रुपयांचा धनादेश आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विरकर मुळे, सचिव एम जी गुंजाळकर व पदाधिकारी उपस्थित होते.

सुपर कन्स्ट्रक्शन कंपनीची  दुष्काळग्रस्तांसाठी 5 लाखाची मदत
     नवी मुंबई, वाशी येथील सुपर कन्स्ट्रक्शन कंपनीने मुख्यमंत्री सहायता निधी (दुष्काळ) साठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे 5 लाख रुपयांचा धनादेश कंपनीचे अध्यक्ष हरबन्ससिंग यांनी विधान भवनात सुपूर्द केला.  यावेळी आमदार कृपाशंकर सिंग व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
 
Top