उस्‍मानाबाद -: उस्‍मानाबाद जिल्‍हा पोलीस पोलीस दलाच्‍या आस्‍थापनेवरील पोलीस अधिकारी (87), पोलीस कर्मचारी (1643), कार्यालयीन कर्मचारी (69) असे एकूण 1 हजार 799 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी मार्च 2013 च्‍या वेतनातून आपले एक-दोन दिवसाचे वेतन असे मिळून एकूण 13 लाख 71 हजार 622 रूपये दुष्‍काळ निधीसाठी जमा करण्‍यात आलेली आहे. सदरची जमा झालेली रक्‍कम मुख्‍यमंत्री सहाय्यता निधी मध्‍ये जमा करण्‍यात आली असल्‍याची माहिती उस्‍मानाबाद जिल्‍हा पोलीस अधिक्षक यांनी दिली आहे.
 
Top