बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : राज्‍यातील दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर मुख्‍यमंत्री सहायता निधीस एक लाखांचा धनादेश माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पृथ्‍वीराज चव्‍हाण यांच्‍याकडे सुपुर्त केला.
    हा निधी येथील लक्ष्‍मी दूध उत्‍पादक व प्रक्रिया संघाच्‍यावतीने देण्‍यात आला. मुंबई येथे यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्‍हाध्‍यक्ष बाळासाहेब शेळके, करमाळा नगरपरिषदेचे उपनगराध्‍यक्ष वैभव जगताप, शिवलिंग सुकळे, काकासाहेब काटे, पिंटू परदेशी आदिजण उपस्थित होते.
    मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी यावेळी राज्‍यातील सहकारी संस्‍था, साखर कारखाना व स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या मदतीने सढळ मदत केल्‍यास गरजूं पर्यंत चांगल्‍या पध्‍दतीची मदत पोहोचविण्‍यात येईल व दुष्‍काळात भरडलेल्‍या व्‍यक्‍तींना मदत होईल, असे त्‍यांनी सांगितले.
    सदरच्‍या मुख्‍यमंत्री सहायता निधीसाठी राजेंद्र राऊत, नागनाथ राऊत, अनिल डिसले, सुभाष डिडवळ, सुनिल मगर, दिलीप खटोड व संचालक मंडळाने सकारात्‍मक चर्चा करुन निर्णय घेतला.
 
Top