बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: उन्‍हाळ्यामध्‍ये जाणवणारा रक्‍ताचा तुटवडा कमी करण्‍याच्‍या उद्देशाने व कै. प्रशांत भैय्या जाधव यांच्‍या पाचव्‍या स्‍मृती दिनानिमित्‍त अयोजित केलेल्‍या रक्‍तदान शिबिरात 150 रक्‍तदात्‍यांनी उत्‍स्‍फुर्त रक्‍तदान करुन आपला सहभाग नोंदविला. या शिबीराचे उदघाटन कै. प्रशांत भैय्या जाधव यांच्‍या प्रतिमेस हार अर्पण करुन करण्‍यात आले. यावेळी लोकमंगल मल्‍टी स्‍टेट को-ऑप बँकेचे चेअरमन रोहन देशमुख, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्‍या अध्‍यक्षा सौ. वर्षाताई ठोंबरे, जीवन ज्‍योत संघटनेचे अध्‍यक्ष अजित कुंकूलोळ, नार्का टेक इंटिलेजस ब्‍युरो हैद्राबादचे अधिक्षक दिनेश चव्‍हाण, सोलापूर विक्रीकर अधिकारी रणजित काशीद, माढा पंचायत समितीचे कृषी अधिकारी बी.डी. कदम, प्रविण जाधव, समाधान पाटील, श्रीकांत शिंदे, अँड. महेश जगताप, सचिन भुसारे, दिपक जुगदार, भगवान पाटील आदी मान्‍यवर उपस्थित होते.
 
Top