मुंबई -: महाराष्ट्र शासनाने खुल्या बाजारातून उभारलेल्या 6.40 टक्के  महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2013 ची परतफेड 11 मे 2013 पर्यंत देय असलेल्या व्याजासह 11 मे 2013 रोजी सममूल्याने करण्यात येणार आहे. उपरोक्त दिनांकास कोणत्याही राज्य शासनाने सुट्टी जाहीर केल्यास त्या राज्यातील अधिदान कार्यालयातील कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करतील. या कर्जात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी आपले रोखे परतफेडीसाठी लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली असे नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत. 
    भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोग बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते, त्याठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेणे आवश्यक आहे.
    रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात, उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करेल.  या कर्जावर 12 मे, 2013 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
 
Top