बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- आगामी 2014 च्‍या लोकसभा व विधानसभेच्‍या निवडणुकीसाठी भाऊसाहेब आंधळकरांच्‍या नेतृत्‍वात निवडणुकीची मोर्चेबांधणी केली जाईल व याबाबत कोणीही कसल्‍याही भ्रमात राहू नये, असा सज्‍जड इशारा देत भाऊसाहेब आंधळकर यांना निवडणुकीच्‍या तयारीला लागा, असा आदेश शिवसेना कार्याघ्‍यक्ष उध्‍दवजी ठाकरे यांनी मुंबईत मातोश्रीवर दिला.
    बुधवारी जिल्‍हासंपर्क प्रमुख विश्‍वनाथ नेरुरकर, मिलींद नार्वेकर यांची भेट भाऊसाहेब व शिष्‍टमंडळाने घेतली. त्‍यावेळी निव्‍उणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर सविस्‍तर चर्चा झाली. यावेळी शिवसेना महिला तालुकाप्रमुख मंगलताई पाटील, शहरप्रमुख दिपक आंधळकर, महिला शहरप्रमुख मनिषाताई नान्‍नजकर, बाबासाहेब कापसे, जयगुरु स्‍वामी, धनराज राणे यांच्‍या कार्यकर्ते उपस्थित होते.
    यावेळी लोकांमध्‍ये सध्‍या चर्चिला जाणारा शिवसेना सोडून गेलेल्‍या गद्दारांचा पुनप्रवेश तसेच शिवसैनिकांच्‍या गैरसमजाबाबत सविस्‍तर चर्चा झाल्‍यावर आपसातील गैरसमज काढून टाका व 2014 च्‍या निवडणुकीच्‍या तयारीला लागा, गाव-वस्‍ती तेथे शिवसेनची शाखा, बुथ यंत्रणा सक्षम करा, कोणत्‍याही परिस्थितीत 2014 मध्‍ये शिवसेना भगवा फडकवणारच, असा विश्‍वास यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात आला. स्‍वतःच्‍या स्‍वार्थासाठी ज्‍या गद्दारांनी शिवसेना संपवण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यांना शिवसैनिक राजकारणातून संपवतील. कोणी कितीही गैरसमज पसरवण्‍याचा प्रयत्‍न केला. तरीही कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या सरकारला लोक कदापीही थारा देणार नाहीत. सर्वसामान्‍य शेतकरी, गरीब जनतेला शिवसेना कायम न्‍याय देत आहे व यापुढेही देईल. गद्दारांच्‍या प्रवेशाबाबत निश्चित राहा, असा विश्‍वास दिल्‍याने आंधळकर व त्‍यांच्‍या समर्थकांत आनंदाचे निर्माण झाले. शिवसेनेच्‍या कार्याबद्दल असलेला विश्‍वास यानिमित्‍ताने आणखीनय दृढ आला.
    आगामी निवडणुकात आर.पी.आय., भारतीय जनता पार्टी, शेतकरी संघटना यांच्‍यासोबत शिवसेना मोठ्या मताधिक्‍क्‍याने आघाडी घेणार आहे. शिवसेनेचे आमदार व खासदार मोठ्या संख्‍येनी विजयी होऊन यापुढे आणखी जोमाने चांगले काम करतील. शिवसनेच्‍यावतीने दुष्‍काळग्रस्‍तांना पिण्‍याच्‍या पाण्‍याची मदत होत असल्‍याने उध्‍दव ठाकरे यांनी आंधळकर यांचे कौतुक केले.
 
Top