सॅमसंगने आतापर्यंतचा आपला सर्वोत्तम स्‍मार्टफोन गॅलेक्‍सी एस4 आज भारतात लॉंच केला. भारतात या स्‍मार्टफोनची किंमत 41 हजार 500 रुपये आहे. शनिवारी दुपारपासून देशभरातील रिटेल स्‍टोर्स तसेच ऑनलाईन शॉपिंग साईटवर हा फोन विक्रीसाठी उपलब्‍ध होणार आहे. अनेक कंपन्‍यांनी यासाठी प्रीऑर्डर बुकींग घेणे सुरु केले आहे.
       सॅमसंगने 14 मार्च रोजी न्‍यूयॉर्कमध्‍ये गॅलेक्‍सी एस4 लॉंच केला होता. तर आज गुडगावच्‍या किंग्‍डम ऑफ ड्रीम्‍समध्‍ये तो भारतात लॉंच करण्‍यात आला. या फोनला जगभरात प्रचंड मागणी मागणी असून जवळपास 50 देशांमध्‍ये तो विक्रीस उपलब्‍ध झाला आहे. लॉंचच्‍या पहिल्‍या महिन्‍यातच 1 कोटी फोन्‍स विकल्‍या जाण्‍याची अपेक्षा आहे. तर जूनपर्यंत हा आकडा 3 कोटींपर्यंत जाऊ शकतो.
       सॅमसंगने भारतासाठी एस4 चे Exynos व्‍हर्जन लॉंच केले आहे. हा फोन आयफोन5 तसेच एचटीसी वन या स्‍पर्धक फोन्‍सला टक्‍कर देणार आहे. आयफोन5 ची किंमत 45,500 रुपये आहे. तर एचटीसी वन ची किंमत 42, 900 रुपये आहे.
     गॅलेक्‍सी एस4बाबत प्रचंड उत्‍सुकता आहे. ग्राहकांनी लॉंचिंगच्‍या आधीच प्रीबुकींग करणे सुरु केले होते. स्‍मार्टफोन युझर्समध्‍ये या फोनबद्दल असलेल्‍या क्रेझचा विचार करता यापूर्वीच्‍या गॅलेक्‍सी एस3 च्‍या विक्रीचा विक्रम हा फोन मोडेल, असा अंदाज आहे. गॅलेक्‍सी एस3 प्रचंड हीट ठरला होता. फक्त 2 महिन्‍यांमध्‍ये 7 लाख फोनची विक्री झाली होती. गॅलेक्‍सी एस4 सद्यस्थितीत जगातला सर्वोत्तम ऍण्‍ड्रॉइड फोन असल्‍याचा दावा करण्‍यात येत आहे. परंतु, हे येणारा काळच ठरवेल.

(साभार - दिव्‍यमराठी)
 
Top