बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील कुबोटा कंपनीने अधिकृत डिलर असलेल्‍या के.टी. ट्रॅक्‍अर यांच्‍यावतीने ग्राहक मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. जानेवारी-फेब्रुवारी 2013 मध्‍ये कुबोटा ट्रॅक्‍टर खरेदी करणा-या 40 पात्र ग्राहकांना 22 ईंची एल.सी.डी. भेट देण्‍यात आले.  पनीचे रिजनल मॅनेजर व मार्गदर्शक आशुतोष देशमुख यांच्‍या हस्‍ते याचे वितरण करण्‍यात आले. प्रास्‍ताविकात के.टी. ट्रॅक्‍टर्सचे संतोष ठोंबर म्‍हणाले, ट्रॅक्‍टरची विक्री तसेच विक्री पश्‍चात सेवा यात आपण अग्रेसर असल्‍याचे सांगितले. के.टी. ट्रॅक्‍टरचे भागीदार प्रविण कसपटे यांनी आभार मानले. यावेळी शाखा मॅनेजर भाऊसाहेब मांजरे, अकलूज शाखेचे माणिक हजारे, सोलापूर शाखेचे व्‍ही.बी. पाटील, उस्‍मानाबाद शाखेचे भारत सलगर यांच्‍यासह कर्मचारी, शेतकरी व हितचिंतक मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
 
Top