नळदुर्ग -: येथील प्रज्ञावंत बहुउद्देशीय सामाजिक संस्‍थेच्‍यावतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करणा-या मान्‍यवरांना राज्‍यस्‍तरीय समता पुरस्‍काराने रविवार दि. 7 एप्रिल रोजी गौरविण्‍यात येणार आहे.
पुरस्‍कार वितरण समारंभ पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते होणार आहे. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्‍हणून जेष्‍ठ समाजवादी विचारवंत पन्‍नालाल सुराणा, नवी मुंबई येथील उद्योजक चंद्रकांत डावरे, नळदुर्गचे नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सावकार, उपनगराध्‍यक्ष शहबाज काझी हे उपस्थित राहणार आहे. हा पुरस्‍कार वितरण समारंभ दि. 7 एप्रिल रोजी नळदुर्ग येथील आपलं घर येथे सकाळी अकरा वाजता होणार आहे.  
समाजातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्‍कृतिक, साहित्यिक, पत्रकारिता, कला, युवक आदी क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केलेल्‍या व समाजाच्‍या सर्वांगीण विकास प्रवर्तनाला अधिक गतिमान करीत असलेल्‍या गुणवंताना प्रज्ञावंत संस्‍थेच्‍यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्‍यस्‍तरीय समता पुरस्‍कार देवून गौरविण्‍यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याचे आवाहन संस्‍थेचे  अध्‍यक्ष विठ्ठल जेटीथोर, सचिव दादासाहेब बनसोडे, उपाध्‍यक्ष बाबासाहेब बनसोडे यानी केले आहे.

 
Top