सांगोला (राजेंद्र यादव) :- सांगोला तालुका प्रवासी संघ व पंढरपूर सोलापूर प्रवासी संघटना यांच्यावतीने सोलापूर विभागाचे वाणिज्य प्रबंधक सुशील गायकवाड यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब मस्के, खजिनदार बाबुराव खंदारे, सचिव ज्ञानदेव बनसोडे, सहसचिव राजु मणेरी, सदस्य संतोष पाटोळे, गौस नाडेवाले, ईर्षाद बागवान, पत्रकार निसार तांबोळी व पंढरपूर सोलापूर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष कुमार नरखेड व सचिव प्रदिप हरिदास यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन देण्‍यात आले.
      सोलापूर-कोल्हापूर दिवसा धावणा-या गाड्या बंद करू नयेत, बंद केल्यास सांगोला स्टेशनचे रोजचे मिळणारे उत्पन्न 25 ते 30 हजार रूपये रेल्वेचे नुकसान होणार आहे. तसेच दि. 3 एप्रिल पासून नविन कोल्हापूर-हैद्राबाद एक्सप्रेस सुरू झालेली आहे. परंतु सांगोला स्टेशनला थांबा नाही. थांबा मिळावा, सोलापूर-कोल्हापूर नविन1 रात्रीच्या गाड्या जुलैपासून चालू होणार आहेत. त्या गाड्यांना सांगोला स्टेशनला थांबा नाही, तरी थांबा मिळावा. या व अशा अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून वाणिज्य महा प्रबंधक सुशील गायकवाड यांनी तुमच्या मागण्यांचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे सादर करीत आहोत, असे आश्वासन दिले.
     वरील मागण्या मान्य न झाल्यास तिव्र रेल्वे रोको आंदोलन छेडले जाणार आहे, अशा स्वरूपाचे निवेदन सादर केलेले आहे.
 
Top