उस्मानाबाद -: खासदार डॉ.पद्मसिंह पाटील यांनी तेरणा मध्यम प्रकल्पाच्या संपादित क्षेत्रात कोणतेही अतिक्रमण केलेले नाही तसेच त्यांच्या नावे असलेली जमीन तेरणा मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी संपादित केलेली नाही, असे कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद पाटबंधारे विभाग, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
        काही शेतक-यांनी बुडीत क्षेत्रात जमीन गाळपेरा करण्याच्या उद्देशाने लागवडीसाठी तयार केल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती आपण जिल्हाधिकारी कार्यालयात 14 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत दिली होती तसेच बुडीत क्षेत्राची सविस्तर पाहणी करुन अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल असेही सांगितले होते. 
              खा.डॉ. पाटील यांनी अतिक्रमण केले असल्याबाबतचा कोणताही वैयक्तीक नामोल्लेख या बैठकीत आपण केला नसल्याचे उस्मानाबाद पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
 
Top