येरमाळा : कळंब तालुक्‍यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेला चैत्री पौर्णिमेपासून शुभारंभ झाला असून लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले आहेत.
    येडेश्वरीच्या चैत्री यात्रेला आज शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे.. दि. २६ एप्रिल हा यात्रेचा महत्वाचा दिवस म्हणजे चुना वेचने आहे. या चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथुन भाविक येत असतात. हे लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले असुन प्रत्येकाला देवीच्या दर्शनाची आस लागल्याचे दिसुन येत होते. उन्हाची तिव्रता जास्त असल्याने भाविक मिळेल त्या झाडाखाली आश्रय घेत होते. चुना वेचण्याचे इतिहासात एक अनन्य साधारण महत्व आहे. हा वेचलेला चुना देवीच्या मंदिराला दिला जातो. त्यामुळे चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला ७ ते ८ लाख भाविक येतात. आजच्या
      या कार्यक्रमाला पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, खा. डॉ. पद्मसिंह पाटील, आ. राणा पाटील, एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष जिवनराव गोरे,  आ. ज्ञानराज चौगुले, आ. ओमराजे निंबाळकर, आ. राहुल मोटे, आ. बसवराज पाटील, जिल्‍हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील  आ. दिलीप सोपल, जि. प. अध्यक्ष सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
 
Top