उस्मानाबाद :- कळंब तालुक्यातील येरमाळा येथील सर्व प्रकारच्या दारु विक्रीची दुकाने दि. 25 व 26 एप्रिल रोजी  बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.  के. एम. नागरगोजे  यांनी जारी केले आहेत. येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक व इतर धार्मिक कार्यक्रम असल्याच्या  पार्श्वभुमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानूसार सर्व देशी-विदेशी मद्य विक्रीची दुकाने, एफएलबीआर-2,परवाना कक्ष, ताडी विक्री व बिअर शॉपी उपरोक्त दिवशी बंद राहतील. 
 
Top