सांगोला -: सांगोला महूद रस्त्यावरील म्हसोबा टेकाजवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होवून दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली. प्रदीप जनार्दन भाटेकर (रा. शेळकेवस्ती, शिवणे ता. सांगोला) व सतीश तुकाराम कोडग (रा. औंढी ता. जत) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत.भाटेकर हा सांगोला सूतगिरणीत कामाला होता. तो आपली ड्यूटी संपवून घरी जात होता. समोरुन येणार्‍या दुचाकीची व त्याच्या दुचाकीची जोराची धडक झाल्याने ते दोघेही खाली पडले व जागीच मरण पावले. दोघांपैकी एकाची गाडी वेगात असल्याने व ती न आवरल्याने हा अपघात झाला असल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून अपघाताची नोंद केली आहे.
 
Top