उस्मानाबाद -: शहरासाठी पाणी उपलब्ध करुन देणा-या उजनी पाणी पुरवठा योजनेच्या कामांची पाहणी आज राज्याचे पशुसवंर्धन व मस्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली. त्यांच्यासमेवत तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे, ब्रिजलाल मोदाणी, विश्वास शिंदे, मधुकर तावडे, नादेरउल्ला हुसेनी अदिंची  उपस्थिती होती.
     येथील हातलादेवीच्या पायथ्याशी असलेल्या साठवण तलावातील खानापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिर व त्या विहिरीमध्ये येणारे उजनीचे पाणी व तेथून शहराला पंपाद्वारे (बुस्टर) होणारा पाणी पुरवठा या कामाची  पाहणी करतांना तेथील अडचणी जाणून घेतल्या. शहराला पाणीपुरवठयाबाबत  कोणताही अडथळा येणार नाही, याची दक्षता तात्काळ घ्यावी व लवकरात लवकर पाणी कसे मिळेल यासाठी  त्यांनी संबंधांना सूचना दिल्या.
       पाहणीनंतर जिल्हाधिकारी  डॉ.एम.नागरगोजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत आढावा घेतला. यावेळी आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर  व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
 
Top