सांगोला (राजेंद्र यादव) :- सांगोला तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा, समस्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी सांगोला तालुका शिवसेनेच्या वतीने जनजागरण मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती सांगोला शहर प्रमुख कमरूद्दीन खतीब यांनी दिली.
    बुधवार दि.3 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता चोपडी गटाची सभा नाझरा येथे, गुरूवार दि. 4 एप्रिल रोजी सायं.6 वा. महूद गटाची सभा महूद चौक येथे, शुक्रवार दि. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वा. वाढेगाव गटाची सभा एखतपूर येथे, शनिवार दि. 6 एप्रिल रोजी घेरडी गटाची सभा घेरडी येथे, रविवार दि. 7 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वा. कोळा गटाची सभा जुनोनी येथे, तर सोमवार दि. 8 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वा. जवळा गटाची सभा मानेगांव येथे होणार आहेत. तरी वरील सर्व सभेस शिवसेनेच्या व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी वेळेवर उपस्थित राहण्‍याचे आवाहन शिवसेना सांगोला तालुका व शहर पदाधिकारी यांनी केले आहे.
 
Top