प्रा.डॉ. कृष्‍णा इंगोले
सांगोला (राजेंद्र यादव) :- सांगोला तालुका उच्चशिक्षण मंडळ संचलित सांगोला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी जेष्ठ साहित्यीक व समीक्षक प्रा.डॉ.कृष्णा इंगोले यांची निवड झाली आहे. 
      सोलापूर विद्यापीठाच्या प्राचार्य निवड समितीने प्रा.डॉ. कृष्‍णा इंगोले यांच्‍या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांची प्राचार्यपदी निवड केली आहे. त्‍यांना साहित्य पुरस्कार, माणदेश शिवराय भूषण पुरस्कार, दलितमित्र मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्काराने सन्मानीत केले आहे. 300 विविध विषयावर त्यांचे हून अधिक लेख नामांकित संदर्भ ग्रंथ आणि इतरत्र प्रसिध्द झाले आहेत. चर्चासत्रे, उदबोधन वर्ग, 350 हून अधिक परिसंवादातून त्यांनी व्याख्याने दिली आहेत. त्यांनी शिक्षक निवड समिती, स्थायी समितीवर कामकाज पाहिले आहे. ते मराठी अभ्यास व संशोधन केंद्र सांगोलेचे अध्यक्ष आहेत. माणदेश ज्ञानपीठ, विद्यापीठ संशोधन सोलापूर विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, सिनेट सदस्य, ऍकॅडमीक कौन्सिलवर कामकाज पहात आहेत. त्यांचे माणदेश स्वरूप आणि समस्या, तुका म्हणे, गावजागर असे विविध ग्रंथलेखन प्रसिध्द आहेत. त्यांनी मराठी साहित्यातील विधवा जीवनाचे दर्शन या विषयावर शिवाजी विद्यापीठात पीएच.डी.प्राप्त केली. त्यांनी आतापर्यंत मार्गदर्शक म्हणून 6 एम.फील. व पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी अनेक कथा, कविता आणि शोधनिबंधाचे संपादन केले आहे. त्यांना ग.दि.मा.मान्यता समितीवर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांनी आपल्या प्रबोधनाने हुशार, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना प्रेरणा देवून मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्रातील लोकजीवन, लोकसंस्कृती, सामाजिक प्रबोधन, ग्रामिण जीवन व साहित्यावर 30 चिंतन व लेखन करणे हा त्यांचा गेल्या वर्षापासूनचा छंद आहे. 
    त्यांच्या या निवडीबद्दल संस्था अध्यक्ष व सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य बाबुराव गायकवाड व संस्था सचिव माजी प्राचार्य म.सि.झिरपे यांनी अभिनंदन केले आहे.
 
Top