बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: अनेक वर्षापासून रखडलेल्‍या तसेच निकीचा बनलेल्‍या देवळाली-बार्शी रस्‍त्‍याच्‍या कामाचा शुभारंभ सोमवार दि. 16 रोजी आर.एस.एम. उद्योग समूहाचे संस्‍थापक राजेंद्र मिगरणे यांच्‍या हस्‍ते श्रीफळ वाढवून करण्‍यात आले. या    वेळी अँड. गुंड, प्रा. अशोक सावळे, दत्‍तात्रय जाधव, शिवाजी काकडे, पंडित मिरगणे, भिमरव दळवी,‍ विलास मिरगणे, नवनाथ अण्‍णा मिरगणे, शिरीष घळके, सुहास मोहिते, कामा पाटील आदी मान्‍यवर उपस्थित होते.
    मागील पंधरा वर्षापासून बनविलेल्‍या रस्‍त्‍याची अत्‍यंत दयनीय अवस्‍था झाली. तरीही राजकीय पुढा-यांनी लक्ष न दिल्‍याने मांडेगाव व देवळाली येथील ग्रामस्‍थ हैराण झाले होते. या ग्रामस्‍थांना सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मिरगणे यांनी सर्व यंत्रणा व कच्‍चा माल देऊन केवळ ग्रामस्‍थांनी श्रमदान केल्‍यास रस्‍ता तात्‍काळ तया करु, असे असा विचार त्‍यांनी मांडला. ग्रामस्‍थांनीही तात्‍काळ होकार दिल्‍याने या रस्‍त्‍याचे काम सुरु करण्‍यात आले आहे.
    देवळाली ते मांडेगाव सात किलोमीटर तसेच मांडेगाव ते बार्शी दहा किलोटीमर असा एकूण सतरा किलोमीटरच्‍या रस्‍त्‍याच्‍या प्रश्‍न सोडविण्‍यासाठी सर्व राजकीय नेते असमर्थ ठरल्‍याने जाणीवपूर्वक आपल्‍याकडे डोळेझाक केले जात असल्‍याची भावना व प्रचंड चीड निर्माण झालेले ग्रामस्‍थ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मिरगणे यांच्‍याकडे गेले व यावेळी त्‍यांनी सांगितलेल्‍या मार्गाने चांगला तोडगा निघाला.
    देवळालीचे सरपंच बाजीराव तांबे, मांडगोवच्‍या सरपंच सौ. सविता दळवी यांनी प्रत्‍येक घरातील किमान एकजण तरी श्रमदान करावे, असे आवाहन करुन लोकांच्‍या प्रश्‍नाची जाण करुन दिली. लोकांनीही त्‍यांच्‍या आवाहनाला तात्‍काळ दर्शवित आपली शेतातील कामे सोडून रस्‍त्‍याच्‍या कामाला प्राधान्‍य देत सकाळी सात पासून कामावर हजर झाले. गावातील लहान मुले देखील या ग्रामस्‍थांना पिण्‍याचे पाणी अथवा भोजनाचे डबे घेऊन कामाचा जागा हजर होत कडक उन्‍हात देखील त्‍यांच्‍या महत्‍त्‍वाच्‍या प्रश्‍नावर गांभिर्याने काम करताना दिसून आले.
    यावेळी श्रमदानासाठी दत्‍तबाळ पाटील, पृथ्‍वीराज तांबे-पाटील, समाधान माळी, निखिल विधाते, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे उपाध्‍यक्ष विकास थोरात, सुंदर तांबे, गणेश सुरवसे, दादासाहेब शेटे, शिवानंद मिटकरी, बाजीराव आप्‍पा तांबे, समाधान माळी, बाबासाहेब शेटे, राजाभाऊ शेटे, शिवकुमार विभुते, नागनाथ लुंगारे, शंकर शेलार, वामदेव चिळले, तुळशीदास आरगडे, नंदू बिरड, अशोक गोटे, विठ्ठल शेटे, अश्रू सोनवणे, परमेश्‍वर माने, मंगेश घंटे, दादा भिरड, शिवाजी शिंदे, हरिदास कदम, अंगद खंदारे, गणेश माळी, सुरेश माने, बंडू माने, ज्‍योतीराव शिंदे, सुरेश माळी, दादा हावळे, बापू शिंदे, तानाजी खंदारे, अंकुश पायघन, जनक गवळी यांच्‍यासह सुमारे चारशे ग्रामस्‍थ श्रमदाते काम करत आहेत.
    मुलीची रस्‍त्‍यातच डिलीव्‍हर झाली : दादाराव शेटे (देवळाली)
    माझी मुलगी गरोदर असल्‍याने तिला प्रसववेदना होत असल्‍याने तीन दिवसांपूर्वी वैद्यकीय गरजेसाठी तिला दुचाकीवरुन तिचा भाऊ बार्शीला घेऊन जात होता. रात्री बारा ते एक च्‍या दरम्‍यानची वेळ होती. परंतु दुचाकीवर नेत असतानाच रस्‍त्‍यातच तिचे बाळंतपणे झाले व फार त्रासाला तिला सामोरे जावे लागले. यावेळी कोणीही मदतीसाठी धाऊन आले नाही. सदरच्‍या प्रकार गावक-यांना कळाल्‍यानंतर त्‍यांनाही फार वाईट वाटले. सदरच्‍या प्रकारानंतर ग्रामस्‍थांनी लवकरात लवकर कामाची सुरुवात करण्‍याचा निर्णय घेतला. सकाळी लवकरच सर्वजण कामाच्‍या ठिकाणी हजर झाले होते, असे बोलताना दादाराव शेट यांनी सांगितले.
 
Top