सोलापूर :-  जिल्हा ग्राह‍क संरक्षण परिषद नवनिर्वाचीत सदस्यांची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांच्या अध्यक्षतेखाली आणि परिषदेचे सचिव उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
    या बैठकीत ग्राहक हक्कांचे संरक्षण व संवर्घन करणे, ग्राहकांकरिता वस्तुची उपलब्धता, त्याची गुणवत्ता, त्या वस्तुंचे दर व ग्राहकांना पुरविल्या जाणा-या सेवा इ. समस्याबाबत, ग्राहक हितासाठी समाजातील विविध यंत्रणांकडून उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सल्ला देणे, शिफारशी करणे, ग्राहकांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या हक्काबाबत जाणीव करुन देणे, कायद्यामधील उणीवा शासनाच्या निदर्शनास आणून त्याबद्दल कायदा अधिक परिणामकारी कसे करता येईल याबदृल अहवाल सादर करणे तसेच ग्राहकांचे संरक्षणाच्या दृष्टीने सेवाभावी संस्थेच्या मदतीने प्रदर्शने, परिसंवाद आयोजित करणे इ. मुद्दयांवर चर्चा करण्यात आली.
    या बैठकीस शासकीय आणि अशासकीय सदस्य उपस्थित होते.
 
Top