सातारा -: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा राज्यात सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसा‍ठी विरोधक रस्त्यावर उतरले असताना सहकारी आमदारांशी चर्चा करूनच राजीनाम्याचा निर्णय घेईल, असे पवार यांनी गुरुवारी फलटणमध्ये स्पष्ट केले.
        अजित पवारांनी अर्वाच्य भाषेत केलेली दुष्काळग्रस्ताची थट्टा सहन केली जाणार नाही. त्यामुळे पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विरोधीपक्षांनी गेल्या तीन दिवसांपासून विधिमंडळाचे कामकाज होऊ दिलेले नाही.
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यात आंदोलने सुरु केली आहेत. अजित पवारांबाबत घृणास्पद प्रकारही उघडकीस आला आहे. दादर येथे बुधवारी मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या पोस्टरवर शाळकरी मुलाकडून लघुशंका करवून घेतली होती. दुसरीकडे औरंगाबादेत शिवसैनिकांनी अजित पवारांच्या प्रतिमेला मूत्र पाजल्याचा प्रकार केला होता. राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरु झालेल्या आंदोलनानंतर आता आपण राजीनामा देणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर अजित पवारांनी हे सूचक उत्तर दिले आहे.
 
* साभार दिव्‍यमराठी

 
Top