उस्मानाबाद -: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे यांनी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी बी.एस.चाकूरकर, चंद्रकांत सूर्यवंशी आणि शिल्पा करमरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 भारतरत्न डॉ. आंबेडकरांना आदरांजली      
                            
सोलापूर  -: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 122 व्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी पार्क चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अनुयायी उपस्थित होते.
 
 
Top