बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : निष्क्रिय पोलीस अधिका-यामुळे एका खुनातील आरोपी आणखी काही जणांचा जीव घेण्‍याची धमकी देत असल्‍याची तक्रार मौजे तावरवाडी (ता. बार्शी) येथील मयताच्‍या नातेवाईकांनी संबंधिताकडे केली आहे. दरम्‍यान आरोपीवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी दि. 26 एप्रिल पासून बार्शी तहसिल कार्यासमोर चक्री उपोषणास सुरुवात झाले आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, शरद जालिंदर ढमढेरे या इसमाची दि. 15 मार्च 2013 रोजी निघृण खून झाले होते. याप्रकरणी विष्‍णु सोपान गवळी व विनोद विष्‍णु गवळी यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करुन यातील एकास अटक करण्‍यात आली असून विष्‍णू हा अद्याप फरार आहे. सदरच्‍या गुन्‍ह्याबाबत पोलिसांना कोणीही साक्षी पुरावे देऊ नये, याकरीता धमक्‍या देणे तसेच स्‍त्रीयांना व लहान मुलांना धमकी दत आहे. याबाबत वैराग पोलिसात दि. 18 मार्च रोजी तक्रारही दाखल झाली आहे. सदरच्‍या खुनाशी संबंधित असलेल्‍या व्‍यक्‍तीला आश्रय देणारे भारत गवळी, विशाल गवळी, दत्‍तात्रय गवळी, दिलीप गवळी, दिपक गवळी, नितीन गवळी, सचिन गवळी, राहुल गवळी (सर्व रा. तावरवाडी, ता. बार्शी) यांच्‍यावरही कारवाई करावी, आरोपीला त्‍वरीत अटक करावी, या मागणीसाठी शुक्रवार दि. 26 एप्रिल पासून बार्शी तहसिलसमोर ग्रामस्‍थ, महिला व लहान मुलांसह चक्री उपोषणास सुरुवात झाली आहे.
 
Top