उस्मानाबाद -: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्यावतीने  उस्मानाबाद येथे पदव्युत्तर,  बी. एड, एम. एड, एम. फील,  पी. एच. डी., एम. बी. ए, बी. ई. मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती व युवक- युवतीसाठी उद्योग क्षेत्रामध्ये व्याख्याता म्हणून काम करण्याची इच्छा असणा-यासाठी व्याख्याता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित  करण्यात आला आहे.
    तरी इच्छूक युवक-युवतीनी प्रवेश अर्ज भरणेसाठी व अधिक माहितीसाठी दि. 19 एप्रिल पर्यंत संपर्क साधावा. अधिक माहिती व अर्जासाठी कार्यक्रम समन्वयक अर्चना माळी (मो. 9822671421) यांच्याशी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद येथे संपर्क साधावा असे आवाहन एम. सी. ई. डी.चे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी आर. आर.  शिंदे यांनी केले आहे.   
 
Top