सांगोला (राजेंद्र यादव) :- म्हैसाळ योजनेचे पाणी केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांच्‍यामुळेच कोरडा नदीतून माण नदीत सोडल्याने खर्‍या अर्थाने कार्यतपस्वी आ. काकासाहेब साळुंखे-पाटील यांची स्वप्नपूर्ती झाली म्हटले तर ते वावगे ठरणार नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आ. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केले.
    केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांनी जवळा येथील जाहीर सभेत कृष्णाचे पाणी म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत व कोरडा नदीतून माण नदीत सोडले. या पाण्याचा माण नदीमध्ये जलपूजनाचा व नदीतील पाणी खालील बंधार्‍यात सोडण्याचा शुभारंभ आ. दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे जेष्ठ नेते आ. गणपराव देशमुख होते. व्यासपीठावर आ. भारत भालके, माजी आ. शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड, तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, कॉंग्रसेच तालुकाध्यक्ष रफिक नदाफ, माजी नगराध्यक्ष प्रा. पी. सी. झपके, नगरसेवक अनिल खडतरे, अरुण बिले, सुहास होनराव, इमाम मणेरी, मनोज सपाटे, आनंद घोंगडे, रावसाहेब इंगोले, जि. प. सदस्या राणीताई दिघे, दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव काळुंगे, प्रभाकर चांदणे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, कृषि उत्पन्न बाजारसमितीचे चेअरमन गिरीष गंगथडे, तात्यासाहेब केदार, चेतनसिंह केदार, शिवानंद पाटील, वाढेगांवचे सरपंच डॉ. धनंजय पवार, उपसरपंच सुलभा भडकुंबे, नंदकुमार दिघे, तानाजी लोकरे, अशोक दिघे, हसीना मुलाणी, मधुकर वसमळे, तुकाराम चौगुले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगोला तालुक्यात येणार्‍या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची अपूर्ण कामे कृषिमंत्री ना. शरद पवारांच्या रुपाने पूर्ण होणार आहे. ब्रॅन्च 5 चे अस्तरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ते अस्तरीकरण झाल्यानंतर पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. टेंभूच्या पाण्यासाठी कृषि मंत्री शरद पवार यांना सतत भेटल्यानंतर त्यांच्या प्रयत्नाने मागील वर्षी 73 कोटी व चालू वर्षी 152 कोटी निधी मिळाला आहे. त्यामुळे टेंभूचे काम येत्या वर्षभराच्या आत पूर्ण होणार आहे. त्या कुणीही तिळमात्र शंका घेण्याचे कारण नाही. इस्त्राईलच्या धर्तीवर उजनीचे 2 टीएमसी उचल पाण्याचा मॉडेल राबवावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. केंद्रीय कृषि मंत्री ना. शरद पवारांना भेटून संबंध राज्यात नव्हे तर देशात इस्त्राईलच्या धर्तीवर आदर्श मॉडेल केले जाणार आहे. त्याचबरोबर कार्यतपस्वी आ. काकासाहेब साळुंखे-पाटील आमदार असताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडे कृष्णा नदीचे पाणी म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत सोडावे. यासाठी प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांचे अपूरे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी ना. शरद पवार यांच्याकडे सातत्याने 8-9 महिने प्रयत्न केला. त्यांनी 16 तारखेला जवळा येथील सभेत म्हैसाळचे पाणी कोरडा नदीत सोडण्याचे आश्वासन नव्हे तर निकालच देतो असे सांगून राज्याच्या जलसंपदा मंत्री ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे 28 मार्चला कै. काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या पुण्यतिथी दिवशी ना. शरद पवारांनी शब्द दिल्याप्रमाणे पाणी सोडून काकासाहेब साळुंखे-पाटील यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. असे आ. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी सांगितले.
    माजी आ. शहाजीबापू पाटील म्हणाले की, जोपर्यंत तालुक्याला पिण्याचे व शेतीचे पाणी मिळत नाही. तोपर्यंत तालुक्याचे भविष्य उज्ज्वल होणार नाही. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून तुमच्याबरोबर मी संघर्षाला तयार असल्याचे शहाजीबापू यांनी सांगितले. आ. भारत भालके म्हणाले देशाचे नेते ना. शरद पवार हे या भागाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या प्रयत्नाने हे पाणी आले असून हे पाणी मंगळवेढा तालुक्यातील बंधारे भरेपर्यंत सुरु ठेवावेत. यासाठी मी आ. दिपकआबा यांच्यासह काही शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ राज्याचे जलसंपदा मंत्री ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांना भेटले व मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून 30 तारखेपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली. 30 तारखेपर्यंत पाणी सोडण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. असे सांगितले.
     अध्यक्षस्थानावरुन आ. गणपतराव देशमुख म्हणाले की, कृष्णेचे पाणी कोरडा नदीतून पहिल्यांदाच माण नदीत सोडून बंधारे भरल्यामुळे माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मंगळवेढा व सांगोला हक्काचे पाणी मिळविण्यासाठी जे जे करता येईल ते करु. पाण्यासाठी आम्ही सर्वानी राजकारण बाजूला ठेवले आहे. त्यामुळे दुष्काळात पाण्याचा प्रश्न सुटला आहे. अस्तरीकरणाच्या कामासाठी एकजुटीने काम करावे लागणार आहे. असे आ. देशमुख यांनी सांगितले.
   यावेळी सरपंच डॉ. धनंजय पवार यांनी प्रास्ताविक केले. म्हैसाळ योजनेचे उपअभियंता पाटोळे यांनी सविस्तर माहिती दिली.
 
Top