गेल्या काही दिवसांपासून उस्मानाबाद शहरावर विमाने घिरट्या घालू लागली आहेत. हे चित्र आता कायमस्वरूपी दिसणार आहे. उस्मानाबादमध्ये ब्ल्यू रे एव्हिएशन कंपनीने विमान प्रशिक्षण केंद्र सुरू केले असून, मराठवाड्यातले हे पहिले केंद्र ठरले आहे.  केंद्रामध्ये 4 विमाने असून 12 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. येत्या आठवड्यात आणखी 4 विमाने दाखल होणार आहेत.
         तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बारामती, नांदेड, उस्मानाबाद आणि यवतमाळ येथील विमानतळांची धावपट्टी रिलायन्स कंपनीला करारावर दिली होती. त्यापैकी उस्मानाबाद विमानतळाची धावपट्टी पुणे येथील ब्ल्यू रे एव्हिएशन कंपनीने भाडेतत्त्वावर घेतली असून येथे विमान प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. तत्कालीन उद्योग राज्यमंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी 2008 मध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करण्यासाठी उस्मानाबाद विमानतळ विकसित करून धावपट्टी 1250 मीटरपर्यंत वाढवली. त्यासाठी सुमारे 4 कोटी रुपये खर्च करण्यात आला. त्यामुळे तळावर आता प्रत्येक बिझनेस जेट विमानाचे लँडिंग होऊ शकते. धावपट्टीवरील टॅक्सी-वेमुळे विद्यार्थ्यांची सोय झाली असून लँडिंगनंतर प्रशिक्षणार्थी आपले विमान धावपट्टीवरून बाजूला घेऊ शकतात. त्यामुळे अन्य विमानांना सोयीने लॅँडिंग करता येते. प्रशिक्षण केंद्रात सध्या 12 पैकी 3 मुली आहेत. त्यांना मुख्य विमान प्रशिक्षक कॅप्टन के.टी. राजेंद्रन, मुख्य ऑपरेटिंग अधिकारी नदिन रझा यांच्यासह एस.आर. मीना, दिवांग दास प्रशिक्षण देत आहेत. हे प्रशिक्षण केंद्र निवासी असून महाराष्‍ट्रासह दिल्ली, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पहिल्या बॅचमध्ये उस्मानाबादचा अझरोद्दीन काझी हा विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. भुवनेश्वर येथील 30 विद्यार्थी येत्या 10 दिवसांत प्रशिक्षणासाठी येणार आहेत. त्यासाठी विमानांची संख्याही वाढवण्यात येत असून, आणखी लहान 3 आणि दोन इंजिने असलेले 1 मल्टी  विमान येत्या चार दिवसांत दाखल होणार आहे. विमान प्रशिक्षणाचा कालावधी सकाळी 7 पासून दुपारी 12 आणि त्यानंतर 4 ते सायंकाळी 7 पर्यंत असतो. याव्यतिरिक्त 2 तास अभ्यास घेतला जातो.करण्यात आला. त्यामुळे तळावर आता प्रत्येक बिझनेस जेट विमानाचे लँडिंग होऊ शकते. धावपट्टीवरील टॅक्सी-वेमुळे विद्यार्थ्यांची सोय झाली असून लँडिंगनंतर प्रशिक्षणार्थी आपले विमान धावपट्टीवरून बाजूला घेऊ शकतात. त्यामुळे अन्य विमानांना सोयीने लॅँडिंग करता येते. प्रशिक्षण केंद्रात सध्या 12 पैकी 3 मुली आहेत. त्यांना मुख्य विमान प्रशिक्षक कॅप्टन के.टी. राजेंद्रन, मुख्य ऑपरेटिंग अधिकारी नदिन रझा यांच्यासह एस.आर. मीना, दिवांग दास प्रशिक्षण देत आहेत. हे प्रशिक्षण केंद्र निवासी असून महाराष्‍ट्रासह दिल्ली, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पहिल्या बॅचमध्ये उस्मानाबादचा अझरोद्दीन काझी हा विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. भुवनेश्वर येथील 30 विद्यार्थी येत्या 10 दिवसांत प्रशिक्षणासाठी येणार आहेत. त्यासाठी विमानांची संख्याही वाढवण्यात येत असून, आणखी लहान 3 आणि दोन इंजिने असलेले 1 मल्टी  विमान येत्या चार दिवसांत दाखल होणार आहे. विमान प्रशिक्षणाचा कालावधी सकाळी 7 पासून दुपारी 12 आणि त्यानंतर 4 ते सायंकाळी 7 पर्यंत असतो. याव्यतिरिक्त 2 तास अभ्यास घेतला जातो.

मुलींसाठी सवलत

वैमानिक बनण्यामध्ये मुलींनी पुढाकार घ्यावा, यासाठी ब्ल्यू रे एव्हिएशन कंपनीने इच्छुक मुलींसाठी शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक  स्थितीप्रमाणे  सवलत देण्यात येते, असे कॅप्टन  नदिन रझा यांनी सांगितले.

वैमानिक होण्याची संधी
विमान प्रशिक्षण कें द्रात 40 कर्मचारी आहेत. त्यापैकी 15 कर्मचारी उस्मानाबादचे असून आणखी टेक्निकल कर्मचाºयांची  भरती होणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे उस्मानाबादमधल्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातल्या मुला-मुलींनी वैमानिक होण्याचे ध्येय बाळगून प्रशिक्षण घ्यावे.
राणा जगजितसिंह पाटील, आमदार

कुटुंबालाही सफर
धार्मिक कार्यक्रमात पुष्पवृष्टी करण्यासाठी किंवा कुटुंबाला स्थानिक परिसरात सफर करण्याची संधी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. माफक दरामध्ये विमानात बसून अवकाशात भरारी घेता येईल. मोठ्या शहरांच्या तुलनेत कमी दरामध्ये विमान उपलब्ध करून देण्यात येते.
के.टी.राजेंद्रन, मुख्य फ्लाइंग इन्स्ट्रक्टर

कोण घेऊ शकतो प्रवेश?

विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी केवळ विज्ञान विषयात 12 वी उत्तीर्णची अट आहे. दीड वर्षात प्रशिक्षण पूर्ण होते. प्रशिक्षण काळात 200 तास विमान चालवावे लागते. 5 परीक्षा घेतल्या जातात. तसेच व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले जातात. सरासरी खर्च 20 ते 25 लाख रुपये.

विमानाची वैशिष्ट्ये
* 200 किमी ताशी वेग
* 200 लिटर इंधन तासासाठी
* 6 तास इंधन पुरते
* 10 हजार फूट उंचीवर विमान जाते
* 4 आसन क्षमता 

- चंद्रसेन देशमुख

सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top