नळदुर्ग  : ओलांडण्‍याच्‍या प्रयत्नात असताना आराम बस व ट्रक यात झालेल्‍या अपघातात दोनही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले तर रस्त्याच्या मधोमध अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतुक दीर्घ काळ ठप्प झाली होती. ही घटना सोलापूर-हैद्राबाद राष्‍ट्रीय महामार्गावरील येणेगुर (ता. उमरगा) येथील पुलाजवळ बुधवारी घडली.
    ट्रकचालक दस्‍तगीर सैफन इनामदार (रा. मुगळी, ता. अक्‍कलकोट), आराम बसचालक इम्रान रहीमतुल्‍ला खान (रा. सिंदखेडराजा) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्‍या ट्रकचालकांचे नाव आहे. यातील मुंबईहून हैद्राबादकडे जाणा-या आराम बसच्‍या चालकाने ओलांडण्‍याच्‍या प्रयत्‍नात हैद्राबादहून मुंबईहून जाणा-या ट्रक (क्रं. एमएच 04, डी.के. 4479) ला जोराची धडक दिली. या धडकेत दोन्‍ही वाहने रस्‍त्‍याच्‍या मधोमध एकमेकात अडकल्‍याने महामार्गावरील वाहतुक दीर्घ काळ ठप्‍प झाली होती. ही घटना समजताच येणेगूर दुरक्षेत्रचे हवालदार गोरोबा कदम, चंदू पवार, गणी शेख, कैलास चाफेकर यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन तीन तासाच्‍या परिश्रमानंतर क्रेनच्‍या सहाय्याने एका बाजूला एकतर्फी वाहतुक सुरु केली. ट्रकचालक दस्‍तगीर इनामदार हा केबीनमध्‍ये अडकला होता. त्‍यास दूरक्षेत्र व महामार्ग पोलिसांनी बाहेर काढून उपाचारासाठी उमगरग्‍याला पाठविण्‍यात आले आहे.
    या घटनेची नोंद मुरुम पोलीस ठाण्‍यात झाली असून आराम बसचालक इम्रान खान याच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून पुढील तपास हवालदार गोरोबा कदम हे करीत आहेत.
 
Top