उस्मानाबाद -: आर्टीलरी सेंटर,नाशिक रोड कँम्प येथे दिनांक 15 ते 17 एप्रिल 2013 दरम्यान सोल्जर जी.डी.,सोल्जर टेक्नीकल व सोल्जर ट्रेडसमेन पदासाठी युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. 
     सदर मेळाव्यामध्ये आजी सैनिक/माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांची व आजी सैनिकांच्या भावासाठी भरती करण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील आजी सैनिक/माजी सैनिक/ विधवांच्या इच्छुक पाल्यांनी /भावांनी  उपरोक्त वेळेनुसार आर्टीलरी सेंटर, नाशिक रोड कँम्प येथे भरतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,उस्मानाबाद यांनी केलेले आहे.
 
Top