उस्मानाबाद :- भारत निवडणूक आयोगाने सन 2013 हे वर्ष मतदार यादी वर्ष म्हणून घोषित केले आहे.  मुख्य निवडणूक  अधिकारी यांनी त्यांचे  दि. 25 फेब्रुवारी 13 अन्वये  पुनरिक्षण पूर्व कार्यवाहीचा कार्यक्रम घोषित केला आहे. परंडा विधानसभा मतदार संघातील   18 ते 19  वयोगटातील मतदारांनी व महिला मतदारानी  मतदार यादीत आपल्या नावाची  नोंदणी करुन घ्यावे, असे आवाहन  सहायक मतदार नोंदणी अधिकारी 243- परंडा विधानसभा मतदार संध तथा तहसीलदार भूम यांनी केले आहे.
       दि. 1 एप्रिल ते 30 जुन 2013 या कालावधीकरीता तहसील कार्यालय, भूम येथे मतदार मदत केंद्र सुरु करण्यात आले असून या केंद्राच्या कामकाजाची वेळ सकाळी 10-30 ते सायंकाळी 5-30 अशी ठेवण्यात आली आहे. संपर्कासाठी 02478-273557 असा आहे.
    या मतदार मदत केंद्रावर मतदारांच्या सोईसाठी खालील सुविधा उपलब्ध आहेत. दि. 1 जानेवारी, 13 या अर्हता दिनांकास 18 वर्षे पुर्ण झालेल्या मतदारांची नावनोंदणी करणे, मयत, स्थलांतरीत, दुबार आदि मतदारांच्या नावाची वगळणी करणे, ज्या मतदारांच्या नावात किंवा इतर मजकुरात दुरुस्ती करावयाची आहे, त्यात दुरुस्ती करणे, छायाचित्र मतदार ओळखपत्र तयार करणे व तयार करण्यात आलेल्या छायाचित्र मतदार ओळखपत्राचे वाटप करणे. याव्यतिरिक्त पुनरिक्षण पूर्व कार्यवाही अंतर्गत भूम तालुक्यातील सर्व 108 मतदार केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचेमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.
       मतदान ओळखपत्र टक्केवारी 100 टक्के करणे, 18 ते 19  वयोगटातील मतदारांची व महिला मतदारांची  जास्तीत जास्त   नावनोंदणी करणे, वंचित राहिलेल्या मतदारांची मतदार यादीत नाव नोंदणी करणे, पुनरिक्षण पूर्व कार्यवाही कायक्रमाचा  जास्तीत जास्त मतदारांनी घ्यावा,असेही कळविण्यात आले आहे.
 
Top