उस्मानाबाद :- लोकशाही दिन उपक्रमाचे स्वरुप शासनाने बदलले असून आता तालुकास्तरावरही दर महिन्याच्या तिस-या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. नागरिकांनी तालुकास्तरावरील तक्रारी अथवा निवेदने संबंधित तालुक्याच्या लोकशाही दिनात दाखल करावीत. नागरीकांनी आपला अर्ज पंधरा दिवस अगोदर पाठवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी केले आहे.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांच्या अध्‍यक्षतेखाली लोकशाही दिन उपक्रम घेण्यात आला. यावेळी नागरिकांच्या तक्रारी  व निवेदने स्वीकारण्यात आली. तालुका पातळीवरील तक्रारी संबंधितांनी  तालुकास्तरावर होणा-या दिनात दाखल कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
    आज झालेल्या लोकशाही दिन उपक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास ,जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, बी. एस. चाकूरकर, के. एस. तडवी, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी के. डी. बोणे व श्री. वानखेडे , महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एम. एस. भालेराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. देशपांडे, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रदीप खोबरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
 
Top