बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: उन्‍हाळ्याच्‍या झळा वाढत चालल्‍याने आनंदयात्री प्रतिष्‍ठान व राष्‍ट्रवादी युवकच्‍यावतीने शहराचे पक्षांचे पात्र व जनावरांच्‍या पानवठ्याचा आरंभ करण्‍यात आले आहे.
    येथील शिवाजी रोड येथे पोलिस उपाधिक्षक रोहिदास पवार व आर्यन शुगर्सचे योगेश सोपल यांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले. यावेळी नगरपषिदेचे बांधकाम विभागाचे सभापती बप्‍पा कसबे, नगरसेवक नागेश अक्‍कलकोटे, पाणीपुरवठा सभापती देविदास शेटे, नगरसेवक गणेश जाधव, अंबादास शिंदे, रुपेश बंगाळे, संदिप बारंगुळे, श्रीकांत शिंदे, आनंदयात्री प्रतिष्‍ठानचे रामचंद्र इकारे, रणजित गायकवाड, हर्षद लोहार, संजय कचरे, उदय कुलकर्णी, राहुल कुंभार, सचिन गावसाने, पंकज शिंदे, बाबा माळगे, कृष्‍णा उपळकर आदीजण उपस्थित होते.
 
Top