मुंबई -: भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेच्यावतीने सन 2012-13 साठी कै. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. निबंध स्पर्धेसाठीचे विषय पुढीलप्रमाणे आहेत.
 
1.    विद्यमान भारतातील लोक प्रशासनाचा अर्थ व संबध्दता
2.    भारतातील नागरी समाज व संसदीय लोकशाही
3.    महाराष्ट्राच्या वर्तमान स्थितीशी संबंधित असा जल संपदेचा विकास व व्यवस्थापन
4.    आपत्ती व्यवस्थापन : अनुभवातून घेतलेला बोध आणि महाराष्ट्राच्या वर्तमान  परिस्थितीबाबत, विशेषत: आग प्रतिबंधक व आग लागल्यानंतरच्या उपाययोजना या संदर्भात भविष्यकालीन धोरण निश्चिती.
     वरील विषयावरील निबंध मराठी किंवा  इंग्रजी  भाषेत कोणत्याही एकाच विषयावर तीन हजार शब्दापेक्षा कमी आणि पाच हजार शब्दापेक्षा जास्त नसावा. निबंध पदव्युत्तर किंवा उच्च दर्जाचा असणे अपेक्षित आहे. संस्थेस प्राप्त झालेल्या निबंधाच्या प्रती परत करण्यात येणार नाहीत. या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस पाच हजार रुपये, दुसरे चार हजार रुपये, तिसरे दोन हजार पाचशे रुपये तर उत्तेजनार्थ रुपये दोन हजार अशी चार पारितोषिके देण्यात येणार आहेत.
     निबंध कागदाच्या एकाच पृष्ठ भागावर टंकलिखित करुन टोपण नावाने चार प्रतीत सादर करावा. स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नये. निबंध बंद लिफाफ्यात ठेवून सोबत स्पर्धकाचे नाव व पत्ता तसेच टोपणनाव असलेला कागद लिफाफ्यात बंद करुन मोठया लिफाफ्यात एकत्र पाठवावा. त्यावर कै. बी. जी. देशमुख, वार्षिक निबंध स्पर्धा 2012-13 असे नमूद करुन तो मानद सचिव, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, खोली क्र.13, तळमजला, मंत्रालय (मुख्य), मुंबई 400032 या पत्त्यावर 31 मे 2013 पर्यंत पाठवावा. तसेच शक्य झाल्यास ई-मेल iipamrb@gmail.com वर ही पाठवावा.
     अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 22793430 (थेट) किंवा 22024243, 22854156, विस्तार क्रमांक 3430 तसेच ई-मेल iipamrb@gmail.com वर संपर्क साधावा, असे संस्थेच्या मानद सचिवांनी कळविले आहे.
 
Top