बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्त्रियांचा गौरव करण्यासाठी स्त्री भूषण पुरस्कार तसेच स्व्.शौभाताई सोपल यांच्यावरील प्रा.डॉ. भारती रेवडकर यांनी लिहिलेल्या अर्धांगिनी या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन केल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा मंदाताई काळे यांनी पत्रिकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम शनिवार दि. 6 एप्रिल रोजी येथील यशवंतराव सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
    या पत्रकार परिषदेत चरित्रग्रंथाच्या लेखिपका डॉ. भारती रेवडकर, सचिव सुरेखा गुळमे, उपाध्यक्षा करुणा हिंगमिरे, नगरसेविका मंगलताई शेळवणे, शैलजा पाटील, सुमन बारसकर, शोभा जाधव, जयश्री हिरफोड, श्रीमती वनिता वाघ, श्रीमती महादेवी गोटे, सुरेखा बचुटे, सुमन कांबळे आदीजण उपस्थित होत्या.
    मागील बारा वर्षापासून स्व्. सौ.शोभाताई महिला बहुउददेशीय संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रातील कार्य करणा-या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कारासाठी तीन महिलांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे येथील साधना सेले (उज्वला लेंगरे), सोलापूर येथील कविता मुरुमकर, बार्शी तालुक्यातील वैराग येथील सुवर्णा भूकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
    या कार्यक्रमासाठी खासदार वंदना चव्हाण, आमदार दिलीप सोलप,  महिला व बालकल्याण समितीच्या जि.प. सभापती जयमाला गायकवाड, अलकाताई सुधीर सोलप हे उपस्थित राहणार आहेत.
 
Top