आ. दिलीप सोपल
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- बार्शी बसस्‍थानक बांधा वापरा हस्‍तांतरीच्‍या अटींवर विकसित करणे व आगाराचे स्‍थलांतरण करण्‍याच्‍या आ. दिलीप सोपल यांच्‍या मागणीला महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या मुंबईतील बैठकीत तत्‍वतः मंजूरी देण्‍यात आली.
    महाव्‍यवस्‍थापक दिपक कपूर यांच्‍या मुंबई सेंट्रल येथील परिवहनच्‍या मुख्‍य कार्यालयात झालेल्‍या बैठकीत यास मान्‍यता देण्‍या आली. यावेळी आ. दिलीप सोपल, मुख्‍य अभियंता स्‍थापत्‍य जयंत इनामदार, विभागीय नियंत्रक धनाजी थोरात, विभागीय अभियंता उबाळे आदीजण उपस्थित होते.
    यावेळी बोलताना आ.सोपल म्‍हणाले, बार्शी शहराचा दिवसेंदिवस वाढत चाललेला विस्‍तार याचा विचार करता सध्‍याच्‍या जागेवरच बी.ओ.टी. तत्‍वावर आधुनिक सोयीसुविधा, लघु उद्योजकांना व्‍यापारी संकुल यासह उभारणी करावी आणि प्रवाशांना चांगल्‍या दर्जाच्‍या सुविधा प्रधान कराव्‍या. याकरीता सध्‍याचे आगार स्‍थलांतरीत करणे गरजेचे आहे. सदरच्‍या बाबींचा विचार करत व शहराची गरज लक्षा घेऊन आ. सोपल यांच्‍या मागणीवरुन तत्‍वतः मंजूरी देण्‍यात आली असून संबंधितांना तातडीने आदेशही देण्‍यात आले आहेत.
    स्‍थापत्‍य अभियंता जयंत इनामदार यांनी व्‍यावहारिक पातळीवर विचार करत बी.ओ.टी. प्रक्रिया राबविण्‍याकामी अंदाजपत्रके तयार करण्‍याचे आदेश दिले आहेत. यावेळी आ.सोपल यांनी राज्‍य परिवहन महामंडळाचे सकारात्‍मक भूमिकेबाबत आभार व्‍यक्‍त केले.
 
Top