बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील कला शिक्षक व कवी रामचंद्र इकारे यांची महाराष्‍ट्र राज्‍य कलाध्‍यापक संघ, पुणे यांच्‍यावतीने दिल्‍या जाणा-या राज्‍यस्‍तरीय आदर्श कलाध्‍यापक पुरस्‍कार 2012-13 साठी निवड करण्‍यात आली आहे.
      संघाच्‍यावतीने राज्‍यभरातील शैक्षणिक, सामाजिक, संघटनात्‍मक तसेच कलात्‍मक योगदानासाठी पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करण्‍यात येते. रविवार दि. 21 एप्रिल रोजी जालना येथे होणा-या 37 व्‍या राज्‍यस्‍तरीय कलाशिक्षक कार्यशाळेत या पुरस्‍काराचे वितरण करण्‍यात येणार आहे.
       यापूर्वी रामचंद्र इकारे यांना सोलापूर जिल्‍हा कलाध्‍यापक संघाने जिल्‍हास्‍तरीय कलाध्‍यापक पुरस्‍कार, त्‍यापूर्वी कृतिनिष्‍ठ शिक्षक, बेस्‍ट टिचर अँवार्ड या शैक्षणिक पुरस्‍काराने साहित्‍यातील योगदानासाठी गदिमांचा वारसदार आदी पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे. त्‍यांच्‍या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्‍यवरांची अभिनंदन केले आहे.
 
Top