उस्मानाबाद :- चैत्र पौर्णिमेनिमित्त कळंब तालुक्यातील येरमाळा येथे दि. 24 ते 30 एप्रिल या कालावधीत श्री येडेश्वरी देवीची यात्रा भरणार असून या निमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात. या पार्श्वभुमीवर दि.24 ते 30 या कालावधीसाठी उस्मानाबाद-औरंगाबाद या मार्गावरील येरमाळा मार्गे होणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी कळविले आहे.
       या कालावधीत औरंगाबाद-सोलापूर-विजापूर या मार्गे ये-जा करणा-या  एस.टी.बसेस तसेच इतर प्रवासी वाहने सरमकुंडी फाटा,भूम,बार्शीमार्गे सोलापूर अशी ये-जा करतील. औरंगाबाद –उस्मानाबाद-सोलापूर या मार्गे ये-जा करणाऱ्या एस.टी.बसेस व इतर प्रवासी वाहने इंदापूर गाव,परतापुर फाटा, मोहा, येडशीमार्गे ये-जा करतील. कळंब-बार्शी या मार्गावरील येरमाळा मार्गे होणारी वाहतूक ढोकी,येडशी मार्गे वळविण्यात आली आहे.
     उस्मानाबाद-औरंगाबाद या मार्गावरील जडवाहतूकीतही बदल करण्यात आले आहे.औरंगाबादहून हैद्राबादकडे ये-जा करणारी वाहने मांजरसुंभा, केज, कळंब, ढोकी चौरस्ता,आळणीफाटा या मार्गे अथवा ढोकी चौरस्ता, औसा, किल्लारी, उमरगा चौरस्ता या मार्गे ये-जा करतील. उस्मानाबाद-औरंगाबाद या मार्गावरील जडवाहने आळणीफाटा, ढोकी चौरस्ता, कळंब, केज, मांजरसुंभामार्गे ये-जा करतील.
       या वाहतूक बदल मार्गातून सर्व प्रकारचे शासकीय वाहने तसेच महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तींची वाहने तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेसाठी उपयोगात आणलेली  वाहने यांना वगळण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.                  
 
Top