सांगोला (राजेंद्र यादव) : शिवरायांनी निर्माण केलेल्या समाजात सद्या बलात्काराची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.शिवरायांच्या काळातली न्यायव्यवस्था पुन्हा एकदा समाजाने स्विकारली पाहीजे,ज्या पध्दतीने शिवरायांनी रांज्याच्या पाटलाचे हाल केले होते असेच कठोर हाल सद्या बलात्कार करणार्‍याचे झाले तरच महाराष्‍ट्रात आपण शिवजयंती साजरे करीत आहोत याचे मला समाधान वाटेल, बलात्कार्‍याला भर चौकात सगळ्यांसमवेत कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहीजे असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान सांगलीचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजी यांनी केले.चोपडी ता.सांगोला येथे जय शिवराय कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने आयोजीत केलेल्या शिवजयंती महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणुन ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिकाजी बाबर होते तर व्यासपिठावर दगडु बाबर,यशवंत बाबर आदी उपस्थित होते.
     पुढे बोलताना भिडे गुरूजी म्हणाले की,समाजात ज्याला सत्य बोलण्याचे व्यसन असते त्याचे बोलणे सगळ्यानांच कडवट लागते.वयाच्या केवळ 14 व्या वर्षी रांज्याच्या पाटलाला शिक्षा करून धर्माचे पालन करणार्‍या शिवछत्रपतींच्या राजनितीचा वापर समाजात कायदा झाला तरच समाज सुस्थितीत येईल. सद्या महाराष्टृात शिवाजी महाराजांचा पाईक असा कोणीच उरला नाही.संस्कृतीचे अध:पतन होत असताना राजकर्ते मात्र आपल्या मतांची सोय करण्यात दंग आहेत.आपली बदली व्हावी म्हणुन विधानसभेचे उंबरठे झिजवणारे शिकलेले लोक बलात्कार करणार्‍याला फाशीची शिक्षा व्हावी म्हणुन कधीच प्रयत्न करीत नाहीत ही आजच्या समाजाची मोठी शोकांतीका आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत बाबर व पाहुण्यांची ओळख सतिश पाटील यांनी करून दिली. सुत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय शिवराय कला क्रिडा व सांस्कृतिक मंडलाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.शेवटी आभार अमोल बाबर यांनी मानले.
 
Top