नळदुर्ग -: तुळजापूर तालुका कॉंग्रेस कमिटी अंतर्गत मानवी हक्‍क विभागाच्‍या सचिवपदी लोहगाव (ता. तुळजापूर) येथील प्रवीण बसवराज पाटील यांची तर चव्‍हाणवाडी (ता. तुळजापूर) येथील प्रशांत बलभीम माने यांची सदस्‍यपदी नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. त्‍याबद्दल त्‍यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
    तुळजापूर तालुका कॉंग्रेस कमिटी अंतर्गत मानवी हक्‍क विभागाच्‍या सचिवपदी प्रवीण पाटील व सदस्‍यपदी प्रशांत माने यांची निवड झाल्‍याचे नियुक्‍तीचे पत्र मानवी हक्क विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी जगताप यांनी दिले. मानवी हक्क विभागाचे तालुका अध्‍यक्ष अँड. संजय कापसे, जिल्‍हा कार्यकारणी सचिव सौ. नळेगावकर आदीजण उपस्थित होते. प्रवीण पाटील व प्रशांत माने यांची निवड झाल्‍याबद्दल प्रशांत देशमुख, गुणवंत जगताप, राहुल शेंडगे, हणमंत फडताळे, शिवानंद पाटील, संदिप पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
 
Top