सोलापूर :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 7 एप्रिल रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली असून या परीक्षेची सुधारित तारीख लवकरच कळविण्यात येईल. अशा आशयाचा ई मेल संदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेला आहे.
    तरी सर्व परीक्षार्थी व या परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे परीक्षा नियंत्रक तथा निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर यांनी कळविले आहे.
 
Top