नळदुर्ग -: नळदुर्ग पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील महात्‍मा गांधी तंटामुक्‍त योजनेत उल्‍लेखनीय कार्य केलेल्‍या सहा गावांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर यांच्‍या हस्‍ते पारितोषिकाचे धनादेश देवून गौरविण्‍यात आले.
    नळदुर्ग पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील खुदावाडी, सलगरा (दि.), आरबळी, गंधोरा, वाणेगाव, वडगाव देव या सहा गावांनी महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव योजनेत उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबद्दल शासनाने या गावांना रोख रक्‍कमेचे पुरस्‍कार जाहीर केले होते. यामध्‍ये खुदावाडी गावास पाच लाख, सलगरा (दि.) पाच लाख, गंधोरा चार लाख, कानेगाव दोन लाख, आरबळी दोन लाख व वडगाव देव दोन लाख यांचा समावेश आहे. दि. 6 एप्रिल रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्‍यात झालेल्‍या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर यांनी वरील सहा गावच्‍या सरपंच, ग्रामसेवक, तंटामुक्‍त समितीच्‍या अध्‍यक्षांना या रक्‍कमेचे धनादेश दिले. यावेळी खुदावाडीचे सरपंच रेवणप्‍पा स्‍वामी, उपसरपंच शिवप्‍पा जवळगे, तंटामुक्‍त समितीचे अध्‍यक्ष शरणप्‍पा कबाडे, वडगाव देवच्‍या सरपंच अनिता पाटील, पोलीस पाटील कल्‍पना मस्‍के, तंटामुक्‍त समितीचे अध्‍यक्ष बाबासाहेब देवकते, वाणेगावचे उपसरपंच मोहन ढेकळे, ग्रामसेवक प्रशांत भोसले, नागनाथ देवकर, आरबळीच्‍या सरपंच नफीसा नदाफ, पोलीस पाटील पंडीत पाटील, तंटामुक्‍त समितीचे अध्‍यक्ष शुभान नदाफ, उपसरपंच अमोल भोसले, सोसायटीचे चेअरमन अंकुश पवार, गंधो-याचे सरपंच रावण जेटीथोर, ग्रामसेवक व्‍ही.एस. पांचाळ, उपसरपंच विश्‍वनाथ मुसळे, तंटामुक्‍त समितीचे अध्‍यक्ष चंद्रहार मुशळे, सलगरा दिवटीचे सरपंच लक्ष्‍मण सोनवणे, ग्रामसेवक जी.के. कुरकुरे आदीजणांनी हे धनादेश स्विकारले.
 
Top