नळदुर्ग -: छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्‍य बहुजनाच्‍या न्‍याय हक्‍काकरीता आपल्‍या जिवनात फार मोठा त्‍याग करुन सामाजिक समता प्रस्‍थापित करण्‍यासाठी त्‍यांनी जिवनाच्‍या अखेरपर्यंत प्रयत्‍न केला आहे. तेंव्‍हा त्‍यागाचे प्रतिक असलेला भगवा झेंडा व समतेचे प्रतिक असलेला निळा झेंडा याचा सर्वांनी आदर करुन रिपाइं कार्यकर्त्‍यांनी गावच्‍या विकास प्रक्रियेत सतत सक्रिय राहण्‍याचे आवाहन रिपाइंचे उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्ष राजाभाऊ ओव्‍हाळ यानी केले.
    तुळजापूर तालुक्‍यातील किलज येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शाखा उदघाटन राजाभाऊ ओव्‍हाळ यांच्‍या हस्‍ते फित कापून करण्‍यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्‍हणाले की, रिपब्लिकन पक्ष हा माजी खासदार रामदास आठवले यांच्‍या नेतृत्‍वाखाली देशपातळीवर बहुजनांच्‍या न्‍याय हक्‍कासाठी संघर्ष करीत असून कार्यकर्त्‍यांनी सर्व जाती धर्मातील लोकाना पक्षात सामावून घेवून गाव तिथे शाखा काढण्‍याचा प्रयत्‍न करुन पक्षाची भूमिका तळागाळातल्‍या जनतेपर्यंत पोहंचविण्‍याचे प्रयत्‍न करावा, असेही त्‍यांनी शेवटी सांगितले.
    यावेळी रिपाइंचे आनंद पांडागळे, जिल्‍हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्‍हा उपाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे, तुळजापूर तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड, अक्‍कलकोट तालुकाउपाध्‍यक्ष सोपान गायकवाड, यूवा आघाडीचे जिल्‍हाध्‍यक्ष रणजित मस्‍के, विठ्ठल जेठीथोर, बाबासाहेब बनसोडे, यूवा आघाडीचे सरचिटणीस गजानन सोनवणे आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
    या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गौतम गवळी हे होते. यावेळी निवडण्‍यात आलेली नूतन शाखा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. शाखा अध्‍यक्ष भरत गवळी, उपाध्‍यक्ष दगडू मस्‍के, सचिव संजय हरीबा गायकवाड, संघटक मनोज गायकवाड आदींजण. याप्रसंगी रिपाइ युवा आघाडीचे तालुकाध्‍यक्ष अरुण लोखंडे, माजी सरपंच मधुकर गायकवाड, प्रभाकर कांबळे, सौ. महानंदा गवळी, शिवाजी गायकवाड, कल्‍लाप्‍पा ढाले, सुभाष गवळी, चिंतामणी गवळी, प्रा.दत्‍ता साखरे, महादेव वाघमारे, संतोष झेंडार यांच्‍यासह कार्यकर्ते, महिला, ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
 
Top