उस्मानाबाद :- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंअंतर्गत अंगणवाडीतील 6 महिने ते 3 वर्षाची बालके, गरोदर माता तसेच 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील तीव्र कमी वजनाच्या बालकांना बचत गट, महिला मंडळे तसेच  ग्राम समुदाय यांच्या मार्फत घरपोच आहार स्थानिकस्तरावर देण्यासाठी प्रकल्पाच्या क्षेत्राच्या मर्यादेत अर्ज मागविण्यात येत आहेत. घरपोच आहार 20 दिवस इतक्या कालावधीसाठी टिकणे बंधनकारक असून या घरपोच आहार पुरवठयासाठी प्रकल्पाचे लाभार्थी संख्या तसेच इतर अनुशंगीक माहिती संबधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. संबधितांनी या ठिकाणी माहिती घेवून त्याच ठिकाणाहून अर्ज घेण्यात यावेत व भरलेले अर्ज दिनांक 6 मेपर्यंत कार्यालयीन वेळेत संबधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.                             
 
Top