पंढरपूर -: केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे हे मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील काही गावांच्या दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी रविवार दि. 31 मार्च रोजी एकदिवसीय दौ-यावर आले होते.
    पंढरपूर येथे आल्यानंतर त्यांनी लाखो वैष्णवांचे श्रध्दास्थान असलेल्या विठ्ठल - रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्यातील दुष्काळ लवकरात लवकर हटावा असे साकडे विठुरायाला घातले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे, बाळासाहेब शेळके, बबनराव अवताडे, कल्याणराव काळे, मंदिर समिती सदस्य बाळासाहेब बडवे, प्रा. जयंत भंडारे आदी उपस्थित होते.
 
Top