बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील शिवाजीनगर परिसरातील चंदेले यांच्‍या जागेची भिंत पडल्‍याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
    सदरच्‍या जागेची मालकी कोणाची, याचा वाद असून कब्‍जा मिळविण्‍यासाठी बारबोले यांच्‍याकडून दमदाटी होत असल्‍याची तक्रार त्‍या जागेचा ताबा असलेल्‍या सौ. शिला चंदेले यांनी पोलीस अधिक्षक यांच्‍याकडे केली आहे.
    तक्रारदार शिला मोहनसिंग चंदेले यांच्‍या मतानुसार, त्‍याचे पती मोहनसिंग यांच्‍याकडून जुगारीच्‍या व्‍यवसनाचा गैरफायदा घेवून भारत बारबोले यांनी संगनमताने पोकळे खरेदीखत लिहून घेतले आहे. यामध्‍ये सदरच्‍या जागेची किंमत 25 लाख असून त्‍याची किंमत 2 लाख असल्‍याचे दर्शवले आहे. सदरची जागा विकायची नसतानाही तसेच सदरच्‍या जागेचा न्‍यायालयात वाद सुरु असतानाही जीवे मारण्‍याची धमकी देवून को-या स्‍टँपवर सह्या घेतल्‍या आहेत. मुले पुणे येथे नोकरीस असतात व घरात एकटी बाईमाणूस असल्‍याने घातपात होण्‍याची शक्‍यता असल्‍याचेही त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे.
    सौ. चंदेले यांनी सदरच्‍या तक्रारीच्‍या प्रत जिल्‍हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक व आमदार यांना दिल्‍या असून सदरच्‍या जागेत कसलाही बदल करु, नये याकरीता चंदेले यांनी न्‍यायालयाकडून त्‍यानी स्‍टे देखील आणला आहे.
 
Top