उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ, बोरगाव तांडा, हंगरगा तांडा, येडोळा तांडा, रामतीर्थ, पाटील तांडा, खुदावाडी तांडा या भागाची   पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ पाहणी करुन त्या भागातील ग्रामस्थांशी चर्चा केली त्यांनी मांडलेल्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. त्यांच्यासमवेत  जि.प. अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, पशुसंवर्धन सभापती पंडीत जोकार, पंचायत समिती उपसभापती प्रकाश चव्हाण, तहसीलदार व्यंकट कोळी, गटविकास अधिकारी तृप्ती ढेरे, सा.बा.उपअभियंता किरकसे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता दशरथ देवकर यांच्यासह पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
    यावेळी बोरगाव (हंगरगा तांडा ते नळदुर्ग) हा रस्ता तयार करण्याचे तसेच या भागात पाणीपुरवठा तात्काळ सुरु करावा, रोजगार हमी योजना, जनावरांसाठी छावण्या व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था तात्काळ करावी, असे त्यांनी सांगितले. खुदावाडी (घोडके तांडा) येथील सामकामाता व सेवालाल महाराज मंदीर सभामंडपाचे भूमिपूजन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच स्वामी रेवणसिध्द यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
 
Top