नळदुर्ग -: येथे शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्‍मोत्‍सव समितीच्‍यावतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्‍मा बसवेश्‍वर महाराज, वीर महाराण प्रताप या तिन्‍ही थोर महापरुषांची एकत्रित जयंती साजरी करण्‍यात येत आहे. त्‍यानिमित्‍त नळदुर्ग येथील एका नवीन कॉलनीला शिवसेनाप्रमुख स्‍वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्‍यात आले आहे.
        यावेळी फलकाचे पूजन सौ. हेमलता आनंद काटकर, सौ. जयश्री बाळासाहेब कुलकर्णी, सौ. अनिता गोपिनाथ माने, सौ. वंदना आनंदराव कदम, सौ. शिला विश्‍वनाथ दत्‍ते, सौ. छाया भास्‍कर देशमुख, सौ. योगिता संजय जाधव, सौ. शोभा पंडित पाटील या सुहासिनी महिलांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख तथा नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, युवा सेना आघाडीचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर घोडगे, शाम कनकधर, शिवाजी धुमाळ, रमेश बेले, शिवाजी कनकधर, राजेंद्र ठाकूर यांच्‍यासह शिव-बसव-राणा समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
फोटो :
 
Top