उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौ+याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
     गुरुवार, दि.11 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता सोलापूरहून अणदूर ता. तुळजापूर  येथे आगमन, राखीव व मुक्काम. शुक्रवार, दि. 12 रोजी सकाळी 10 वाजता अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. स.11-15 वा. शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. दु.2-30 वा. उस्मानाबाद येथून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण. दु.3 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. सायं.5 वा. तुळजापूर येथून मौ.सावरगांव ता.तुळजापूरकडे प्रयाण. सायं.5-45 वा. कै. कालिदासमामा लिंगफोडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भेट. स्थळ- मौ. सावरगांव . त्यानंतर सोयीनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
     शनिवार, दि.13 एप्रिल रोजी स.11 वा. अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण. स.11-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव.त्यानंतर सोयीनुसार अणदूरकडे प्रयाण,आगमन व मुक्काम. रविवार, दि. 14 रोजी सायं. 6-30 वाजेपर्यंत अणदूर येथे राखीव. सायं. 6-30 वा. अणदूर येथून सोलापूरकडे प्रयाण.
 
Top