उस्मानाबाद :- जिल्ह्यातील पाणीटंचाई संदर्भात केल्या जाणा-या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करुन विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी टंचाई उपाययोजनांचा आढावा घेतला. उमरगा शहरासाठी महत्वाच्या असणा-या माकणी योजनेच्या कामाची पाहणी करुन त्यांनी कामाबद्दल समाधान व्यक्त केले. याशिवाय उजनी पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात हातलादेवी येथे सुरु असलेल्या कामाचीही त्यांनी पाहणी केली.
     जयस्वाल यांनी माकणी येथे प्रत्यक्ष धरणक्षेत्राला भेट दिली. तसेच वाढीव उमरगा पाणीपुरवठा योजनेसंदर्भात माहिती घेतली. या योजनेची पाहणी करताना त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, लातूरचे जिल्हाधिकारी विपीन शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम. एस. भालेराव, उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, उमरगा नगर पालिका मुख्याधिकारी संतोष टेंगळे आदींची उपस्थिती होती.
    त्यानंतर जयस्वाल यांनी समुद्राळ येथील तात्पुरती नळपाणीपुरवठा योजना, बोरी धरणावर पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी केलेल्या इव्हलॉक उपाययोजनेचीही प्रत्यक्ष भेट देवून माहिती घेतली.
 
Top