नळदुर्ग : वागदरी (ता. तुळजापूर) येथे भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 122 व्‍या जयंती निमित्‍ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. येथील डॉ. आंबेडकर जयंती उत्‍सव मंडळाच्‍यावतीने गावपातळीवर शालेय विद्यार्थ्‍यांसाठी निबंध स्‍पर्धा, वादविवाद स्‍पर्धा, रांगोळी स्‍पर्धा, रांगोळी, मॅरथॉन आदी स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे.
    निबंध स्‍पर्धेमध्‍ये इयत्‍ता पाचवी ते सातवी विद्यार्थ्‍यांसाठी ‘माझा आवडता नेता’ किंवा ‘विद्येची देवता सावित्रीबाई फुले’ तर इयत्‍ता आठवी ते बारावीच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी ‘माझ्या स्‍वप्‍नातील आदर्श गाव’ किंवा ‘वृक्ष संवर्धन काळाची गरज’ हे विषय आहेत. तर इयत्‍ता सातवी ते बारावीच्‍या खास विद्यार्थींनीसाठी रांगोळी स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. तसेच ‘विज्ञान शाप की वरदान’ या विषयावर इयत्‍ता सातवी ते बारावीच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी वादविवाद स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले असून इयत्‍ता पाचवी ते आठवी व इयत्‍ता नववी ते बारावी विद्यार्थ्‍यांकरीता दोन गटामध्‍ये मॅरथॉन स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. दि. 29 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता बक्षीस वितरण, व्‍याख्‍यान व भीमगीत गायनाच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यावेळी मान्‍यवरांचा सत्‍कार करण्‍यात येणार आहे. तर दि. 30 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेची भव्‍य मिरवणूक काढण्‍यात येणार आहे. तरी वरील सर्व कार्यक्रमाचे लाभ घ्‍यावा, असे आवाहन रिपाइंचे तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड, मंडळाचे अध्‍यक्ष हणमंत वाघमारे, उपाध्‍यक्ष आण्‍णसाहेब वाघमारे, तुळशीराम वाघमारे, महादेव वाघमारे, बाबासाहेब वाघमारे आदींनी केले आहे.
 
Top